Join us

Maharashtra Weather Update : उन्हाचा तडाखा वाढला; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:10 IST

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सून परतल्यानंतर उष्णतेचा तडाखा वाढू लागला आहे. पिकांची काढणी सुरू असतानाच तापमानवाढीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही आठवड्यांत पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांची झोडपाच झाली होती. (Maharashtra Weather Update)

पण आता पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. उन्हाचा तडाखा आणि तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यात उष्णतेचा चटका वाढणार असून, दिवसाच्या तापमानात झपाट्याने वाढ होणार आहे. अफगाणिस्तान व मध्य आशियातून येणाऱ्या शीतलहरींमुळे हिमालयीन राज्यांत थंडी वाढली असून, ही थंडी लवकरच मैदान प्रदेश आणि महाराष्ट्रातही जाणवेल.(Maharashtra Weather Update)

तापमान वाढणार

नैऋत्य मान्सून सध्या महाराष्ट्रातून परतीच्या मार्गावर आहे. पुढील ४८ तासांत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यानंतर उष्णतेचा तडाखा वाढेल. विशेषतः मुंबई, कोकण आणि मराठवाडा भागात दमट व तापमानवाढीचे वातावरण राहणार आहे. सध्या राज्यात कमाल तापमान ३५°C पर्यंत पोहोचले असून, किमान तापमान सुमारे २३°C आहे.

थंडीची चाहूल

हिमालयीन राज्यांमध्ये सुरू झालेली बर्फवृष्टी लवकरच उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीची चाहूल जाणवेल. ऑक्टोबरच्या अखेरीस रात्रीचे तापमान कमी होईल, आणि नोव्हेंबरपासून राज्यभरात थंडीचा प्रभाव वाढेल.

तापमानवाढीचा परिणाम

हवामानातील या अचानक बदलाचा परिणाम केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच नाही तर शेती पिकांवरही होऊ शकतो.

उष्णतेमुळे धान्य सुकवताना ओलावा आणि बुरशीचा धोका वाढतो.

फळबागा आणि भाजीपाला पिकांना ताण बसू शकतो.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* मान्सूननंतरचा हा काळ खरीप काढणी आणि साठवणीचा असतो. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खालील काळजी घ्यावी:

* कापणी केलेल्या पिकांना थेट उन्हात ठेवू नका. सुकवताना सावलीत व वाऱ्याच्या दिशेने ठेवा.

* धान्य व डाळी साठवताना ओलसर जागा टाळा, अन्यथा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

* फळबागांसाठी हलके पाणी देणे सुरू ठेवा, जेणेकरून झाडांना उष्णतेचा ताण बसणार नाही.

* भाजीपाला आणि पालेभाज्यांवर कीडनाशक फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करा.

* थंडीच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन आणि फवारणीचे नियोजन करा.

* शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची  काळजी घ्यावी पुरेसे पाणी प्या, उन्हात दीर्घकाळ राहणे टाळा, हलके कपडे वापरा.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर; राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments

Web Summary : Maharashtra's weather is under scrutiny. Stay updated on the latest forecast. Key developments are being monitored. Be prepared for changing conditions. Important weather news.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा