Maharashtra Weather Update : गणेश चतुर्थीच्या स्वागतासोबतच राज्यातत पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथा व विदर्भात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)
यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर करून शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनो गणेशोत्सवा पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. (Maharashtra Weather Update)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि त्यास पोषक हवामान निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भासह मराठवाड्यातही आज (२७ ऑगस्ट) रोजी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा किनाऱ्यालगत तयार झाले असून, समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. (Maharashtra Weather Update)
ही प्रणाली वायव्य दिशेने सरकत असून, पुढील काही तासांत तिची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात आज व उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. (Maharashtra Weather Update)
कोणत्या भागात किती पाऊस?
ऑरेंज अलर्ट
सातारा घाटमाथा : अतिजोरदार पावसाचा अंदाज, नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यलो अलर्ट
कोकण विभाग : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र : नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात यलो अलर्ट दिला आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतातील निचऱ्याची व्यवस्था करा.
* सोयाबीन व कडधान्ये पिकांसाठी सतत ओलावा राहिल्यास शेंगा कुजण्याचा धोका होऊ शकतो.
* भाजीपाला पिकांमध्ये रोगराई रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करा.