Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : थंडीचा 'डबल अटॅक'; अचानक उबदार वातावरणानंतर डिसेंबरमध्ये जोरदार थंडी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:30 IST

Maharashtra Weather Update : राज्यात नोव्हेंबरच्या शेवटी ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस, तर डिसेंबर–जानेवारीत कडक थंडी असा हवामानाचा 'डबल सीझन' सुरू होणार आहे. या बदलामुळे कृषी क्षेत्रासह नागरिकांनाही अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानातील चढ-उतार, अचानक पावसाच्या फेऱ्या आणि हिवाळ्यातील अस्थिरता यंदाच्या रब्बी हंगामासाठी मोठी चिंता निर्माण करत आहेत. 

IMD ने दिलेल्या माहिती नुसार, ला नीना, निगेटिव्ह IOD आणि निगेटिव्ह NAO या तीन जागतिक हवामान घटकांच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रातील हिवाळा यंदा लांब, तीव्र आणि अनिश्चित ठरणार आहे.

हवामानातील रोलरकोस्टर!

शनिवारपासून राज्यात थंडी काहीशी कमी होताना दिसत आहे तर ढगाळ वातावरण, आर्द्रतेत वाढ आणि हलका पाऊस अशी स्थिती राहील.२३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

या उबदार वातावरणामुळे दिवसाचे तापमान : ३०–३३°C

किमान तापमान : १६–२०°C

मात्र ही उब फार काळ टिकणार नाही. 

हवामान तज्ज्ञांचे अंदाज सांगतात की, मध्य डिसेंबरपासून थंडीचा जबरदस्त पुनरागमन होणार आहे.

डिसेंबर–जानेवारीत 'तीव्र थंडीच्या' लाटा येणार!

यंदा जेट स्ट्रीम अतिशय कमकुवत असल्याने थंडी दक्षिण भारतापर्यंत खाली सरकणार आहे. काही लो-लॅटिट्यूड वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील महाराष्ट्रावर परिणाम करतील.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीव्र थंडी

जानेवारीत कडाक्याचा कळस

उत्तर महाराष्ट्र : दाट धुके, थंडीची लाट

विदर्भ : तापमानात मोठी घट, ७–८°C पर्यंत जाण्याची शक्यता

मराठवाडा : तीव्र थंडीची सलग लाट

कोकण–मध्य महाराष्ट्र : किमान तापमानात ३–५°C घट

हवामान विभागाचा इशारा दिला आहे की जानेवारी हा यावर्षी सर्वात थंड महिना ठरू शकतो. 

अचानक पावसाचे फेरे 

आगामी काही दिवसांतील पावसामुळे रब्बी पिकांच्या सिंचनात अडथळे निर्माण होऊ शकतात.

हरभरा व गहू लागवडीवर परिणाम होईल.

कानगोट्या, पानांवर रोगांचा धोका वाढू शकतो

भाजीपाला व फळबागांवर शीतलहरचा परिणाम संभव

मध्य डिसेंबरनंतर येणारी तीव्र थंडी 

गहू, हरभरा, मका यांच्यासाठी अनुकूल

बटाटा, कांदा, टोमॅटो, पालेभाज्या यांच्यासाठी धोकादायक

फळबागांवर (डाळिंब, द्राक्ष, केळी) थंडी आणि धुक्याचा दुहेरी प्रभाव राहील

यंदाचा हिवाळा अनिश्चित का आहे?

* ला नीना – तापमानात मोठी घसरण* निगेटिव्ह IOD – असामान्य पाऊस* निगेटिव्ह NAO – उत्तर भारतातील थंडी दक्षिणेकडे ढकलते* कमकुवत जेट स्ट्रीम – थंडीचा प्रदेश दक्षिणेकडे सरकतो* वेस्टर्न डिस्टर्बन्सचा दक्षिणेकडे प्रवास

या तिहेरी परिणामामुळे हिवाळा अधिक लांब, अधिक तीव्र आणि वारंवार बदलणारा असा दिसणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* हवामान अंदाजानुसार सिंचनाचे नियोजन

* उशीरा पेरणी टाळावी

* पिकांवर संरक्षणात्मक फवारणी

* थंडी–धुक्यातून बचावासाठी मल्चिंग/तुषार सिंचनाचा वापर करा

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Alert : हवामानात होणार मोठा बदल; कुठे पाऊस, कुठे थंडी? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Latest Updates and Forecast Overview

Web Summary : Maharashtra's weather update indicates changing conditions. Stay informed about the latest forecast. Expect potential rainfall and temperature fluctuations. Take necessary precautions and monitor official weather advisories for safety. Be prepared for any weather-related disruptions.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ