Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट कायम! 'या' भागात हुडहुडी भरणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 09:30 IST

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट (Cold wave) अधिक तीव्र होत असून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडगार वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून पुढील काही दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोणत्या भागात सर्वाधिक गारठा आहे आणि आजचे हवामान कसे असेल, जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यभरात सध्या थंडीची लाट (Cold wave)  पाहायला मिळत असून तापमानात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. (Maharashtra Weather Update)

थंडगार वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट नोंदवली जात असून ही थंडीची लाट (Cold wave)  पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज (१३ डिसेंबरपर्यंत) थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्याने, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये गारठा जाणवत राहील.

मराठवाड्यातील काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळपास असले तरी थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. 

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले किमान तापमान पाहिले असता मुंबई (कुलाबा) येथे २०.६ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ७.३ अंश सेल्सिअस, नाशिक येथे ७.८ अंश सेल्सिअस, गोंदिया आणि मालेगाव येथे प्रत्येकी ८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे नोंदले गेले असून येथे गारठा अधिक जाणवत आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागांत थंडीची लाट अनुभवास येत असून किमान तापमानात फारसा बदल झाला नसला तरी थंडीचा प्रभाव कायम आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या कमी राहिले आहे. उत्तर कोकणात तापमान सामान्यपेक्षा कमी असून उर्वरित भागांमध्ये ते साधारणपणे सामान्य पातळीवर आहे.

पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाशित हवामान राहणार आहे. 

पुढील २४ तासांत राज्यातील कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. त्यानंतर कमाल तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानही पुढील २४ तास स्थिर राहून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे.

मुंबई, पुणे परिसराचा अंदाज

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

१३ डिसेंबर रोजी पुणे आणि आसपासच्या परिसरात थंडीचा प्रभाव जाणवणार असून पुण्यात कमाल तापमान २९ अंश आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 

पाषाण आणि एनडीए भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. लोहेगाव, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क आणि लवळे परिसरात किमान तापमान १३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.

मच्छिमारांसाठी इशारा

खोल समुद्रासाठी आणि काही किनारपट्टी भागांसाठी हवामान विभागाने इशारा जारी केला आहे. मन्नारच्या आखातात आणि लगतच्या कोमोरिन भागात ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी या भागात मासेमारीसाठी जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वाढलेल्या थंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थंडीची तीव्रता लक्षात घेता पुढील काही दिवस उबदार कपडे वापरणे आणि आरोग्याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये थंडीमुळे वाढ मंदावू शकते.

* सकाळी दव जास्त असल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे पिकांची नियमित पाहणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha Weather : विदर्भाचे नंदनवन थंडीत गारठले; दिवसाही शेकोट्या पेटल्या वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments

Web Summary : Maharashtra weather update indicates changing conditions. Stay informed about potential rainfall, temperature fluctuations, and advisories. Monitor official sources for timely updates and safety precautions. Be prepared for weather changes.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ