Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर हवामानाचा मोठा इशारा; कुठे कडाक्याची थंडी, कुठे उकाडा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:20 IST

Maharashtra Weather Update : राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे सोसाट्याचे वारे तर काही भागांत उकाडा जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : हिमालय परिसरातून येणाऱ्या तीव्र शीतलहरींमुळे देशाच्या उत्तरेकडील भागात तापमान झपाट्याने घसरत असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे.(Maharashtra Weather Update)

मात्र, याचवेळी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हवामानाचा लहरी स्वभाव पाहायला मिळत असून, कधी थंडी तर कधी उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रविवारचा दिवस राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.(Maharashtra Weather Update)

पुढील २४ तासांत ढगाळ वातावरण, तापमानात चढ-उतार

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील २४ तासांत देशातील अनेक भागांत ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे.

मध्य, दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतात ढगांची दाटी राहणार असून महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवेल. मुंबई आणि कोकण परिसरात दमट हवामानासह आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.

घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटे धुके आणि दवबिंदूंमुळे गारठा कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र सरासरी तापमानात काहीशी वाढ नोंदवली जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण असमान राहील, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सागरी किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे

कोकण आणि सागरी किनारपट्टी भागांमध्ये सूर्यास्तानंतर सोसाट्याचे आणि काहीसे थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी आणि मासेमारी करणाऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

विदर्भ- मराठवाड्यात कोरडी हवा, काही भागांत गारठा

विदर्भ आणि मराठवाड्यात हवा कोरडी राहण्याचा अंदाज असून, सोलापूर, सातारा (पाचगणी, वाई) याठिकाणी पुढील २४ तास गारठा कायम राहणार आहे.

मध्यप्रदेशाच्या उत्तर-पश्चिम भागात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून ताशी २५ ते ३० किमी वेगाने आर्द्र वारे वाहत आहेत.

याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण वाढले असून थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

उत्तर भारतात पावसाचा कहर, नवा झंझावात सक्रिय

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून तापमानात आणखी घट होणार आहे. २६, २७ आणि २८ जानेवारीदरम्यान एक नवा पश्चिमी झंझावात सक्रिय होत असून त्याचा परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशापर्यंत जाणवेल.

जम्मू आणि हिमाचलच्या मैदानी भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही मैदानी भागांतही अनपेक्षित हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

राज्यात थंडी नाही, उलट उकाडा आणि प्रदूषण वाढले

जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून सकाळी गारठा आणि दुपारी उकाडा जाणवत आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत थंडी कमी असल्याचे चित्र आहे.

राज्यातील नीचांकी तापमान धुळ्यात १०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर निफाडमध्ये कमाल तापमान ३२.६ अंशांपर्यंत पोहोचले. पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमान ०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

रविवारचा दिवस काही भागांत थंडीचा, काही ठिकाणी उकाड्याचा आणि काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांचा ठरण्याची शक्यता असून, सुट्टीचे बेत आखताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update : प्रजासत्ताक दिनापर्यंत कसे असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments Across the State

Web Summary : Maharashtra weather updates indicate ongoing monitoring. Stay informed about changing conditions and potential impacts across the state. Get the latest weather forecast.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजकोकणमहाराष्ट्रविदर्भमराठवाडा