Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Alert : हवामानात होणार मोठा बदल; कुठे पाऊस, कुठे थंडी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:20 IST

Maharashtra Weather Alert : अंदमान-निकोबारपासून महाराष्ट्र आणि उत्तर भारतापर्यंत हवामान बदलाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. पुढील तीन दिवसांत कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासात हवामानात होणार मोठा बदल होणार आहे.(Maharashtra Weather Alert)

Maharashtra Weather Alert : अंदमान-निकोबारपासून महाराष्ट्र आणि उत्तर भारतापर्यंत हवामान बदलाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. (Maharashtra Weather Alert)

पुढील तीन दिवसांत कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासात हवामानात होणार मोठा बदल होणार आहे.(Maharashtra Weather Alert)

IMD ने दिलेल्या माहिती नुसार, देशात पुन्हा एकदा हवामानातील मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसत आहेत. येत्या १० दिवसांत देशभरात हवामानात मोठे बदल घडून येणार आहेत. दक्षिण भारतात अतिवृष्टी, महाराष्ट्रात तापमान वाढ, तर उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा कडाका वाढणार आहे.(Maharashtra Weather Alert)

२२ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र 

दक्षिण अंदमान समुद्राजवळ २२ नोव्हेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार झाले आहे. हे पुढे तीव्र होत २४ नोव्हेंबरला डिप्रेशन (Depression) मध्ये रूपांतरित होऊ शकते. यामुळे अंदमान-निकोबार तसेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा धोका वाढला आहे.

महाराष्ट्रात थंडीची लाट नाही – तापमान वाढणार

महाराष्ट्रात थंडी वाढण्याऐवजी पुढील काही दिवस तापमान वाढण्याची चिन्हे आहेत. पुढील ३ दिवसांत किमान तापमानात २–३°C वाढ होऊन दिवसाचे तापमान जरा दमट राहील तर रात्रीची थंडी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील ४८ तास पावसाची शक्यता नाही तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण बदलते तापमान पिकांवर परिणाम करू शकते.

उत्तर-पश्चिम भारतात पुन्हा थंडी वाढणार

दिली, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये पुढील आठवड्यात किमान तापमानात २–४°C घट होईल. थंडीचा कडाका पुन्हा वाढणार असून हिमालयीन राज्यांत हिमवृष्टीची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* किमान तापमान २–३°C ने वाढणार असल्याने जमिनीतील आर्द्रता कमी होऊ शकते.

* ज्वारी, गहू, भाजीपाला, उसासाठी पाणी सावधगिरीने द्यावे.

* जादा पाणी देणे टाळा, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Lakhpati Didi Scheme : लखपती दीदींना 'उमेद' ची सक्षम साथ; ग्रामीण महिला झाल्या आर्थिक स्वावलंबी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments

Web Summary : Maharashtra weather update indicates upcoming changes. Stay informed about developing weather patterns and potential impacts across the state. Get the latest forecast details for your region and prepare accordingly.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा