Maharashtra Rain : बुधवार दि. १५ ऑक्टोबर ते सोमवार दि. २० ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
दोन दिवस पावसाचा प्रभाव अधिक-
त्यातही विशेषतः दोन दिवसा दरम्यान म्हणजे बुधवार-गुरुवार दि. १५-१६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.
मान्सूनची शेवटची ही दोन आवर्तने-
वरिल रब्बी हंगामातील चौथ्या आवर्तनातील शेवटच्या चरणातील कालावधीत तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाचव्या व शेवटच्या आवर्तनातील अपेक्षित पावसाचे स्वरूप पाहता, रब्बीच्या लागवडी व शेतकामासाठी हा पाऊस लाभदायीच ठरू शकतो, असे वाटते.
मान्सूनच्या परतीच्या पावसाची सद्यस्थिती-
मान्सूनने आज परतीच्या प्रवासात यूपी, एमपी, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा ओलांडून कर्नाटक, तेलंगणा, प. बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे.
त्याची आजची सीमा रेषा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, कांकर, केओंझघर, सागर आयलंड, गुवाहाटी शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी ८५ टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी १५ ऑक्टोबरच्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित १५ टक्के भुभागावरून मान्सून परतेल, असे वाटते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.