Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Latest News Maharashtra Rain Rain likely in these districts for next five days from today, read in detail | Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे अनेक पिकांना फटका बसत आहे.

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे अनेक पिकांना फटका बसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain :  राज्यातील बहुतांश भागात पावसाची (Rain) रिपरिप सुरूच आहे. यामुळे अनेक पिकांना फटका बसत आहे. अशातच पावसाच्या विश्रांतीबाबत एका अपडेट समोर आली आहे. जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाची उघडीप होणार आहे. आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते.
                
मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप परवा मंगळवार दि. ९ सप्टेंबरपासुन जाणवेल, असे वाटते. 

पुन्हा पाऊस -
                              
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ, खान्देश व नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या २१ जिल्ह्यांत शुक्रवार दि.१२ सप्टेंबरपासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते
                           
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.


- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Latest News Maharashtra Rain Rain likely in these districts for next five days from today, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.