Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पाऊस कसा असेल, पहा तारखानिहाय कुठे- कुठे पाऊस

Maharashtra Rain : महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पाऊस कसा असेल, पहा तारखानिहाय कुठे- कुठे पाऊस

Latest News Maharashtra Rain How will the rain be in Maharashtra till Dasara, see date-wise rain probability | Maharashtra Rain : महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पाऊस कसा असेल, पहा तारखानिहाय कुठे- कुठे पाऊस

Maharashtra Rain : महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पाऊस कसा असेल, पहा तारखानिहाय कुठे- कुठे पाऊस

Maharashtra Rain : रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या (शनिवारी २७ ला) सकाळपर्यंत हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतर होत आहे.  

Maharashtra Rain : रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या (शनिवारी २७ ला) सकाळपर्यंत हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतर होत आहे.  

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain :  मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या (शनिवारी २७ ला) सकाळपर्यंत हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतर होत आहे.  

चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगरमार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासुन म्हणजे शनिवार दि. २७ सप्टेंबरपासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्यातही अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा खालील प्रमाणे. 

शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव लातूर नांदेड 

रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा. 

सोमवार व मंगळवार दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड व नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा. 
               
उघडीपीची शक्यता - 
शुक्रवार दि. ३ ऑक्टोबरपासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते. 
              
नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरण जल -संचय - 
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात  मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या  धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते. 
                

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune

Web Title: Latest News Maharashtra Rain How will the rain be in Maharashtra till Dasara, see date-wise rain probability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.