Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Latest News Maharashtra rain Heavy rains in few district for next five days of September, read in detail | Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Rain : मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain :  एकीकडे पावसाची रिपरिप (Rain Alert) सुरूच आहे. दुसरीकडे मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. 

त्यानुसार ०२ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात ग्रीन अलर्ट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

०३ सप्टेंबर रोजी सातारा, सातारा घाट, सांगली, कोल्हापूर घाट, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात ग्रीन अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, अमरावती, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

०४ सप्टेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात ग्रीन अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाट सातारा घाट, कोल्हापूर घाट ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा घाट इत्यादी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. 

०५ सप्टेंबर रोजी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात यलो अलर्ट तर नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे घाट या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. 

तर ६ सप्टेंबर रोजी नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, पुणे घाट, रायगड, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Latest News Maharashtra rain Heavy rains in few district for next five days of September, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.