Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट

Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट

Latest News Maharashtra Rain Cyclone Montha has passed weather in Maharashtra has started to calm down | Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट

Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली.

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली.

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही, दोन्हीही समुद्रातील प्रणाल्याच्या परिणामातून गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली.
                   
बंगालच्या उपसागरातील ' मोंथा ' चक्रीवादळाचे अवशेष काल दि. १ नोव्हेंबरला हिमालयीन प. बंगाल मध्ये विरळले. अरबी समुद्रातील डिप्रेशन उद्या गुजरातमधील कच्छच्या आखातात विरळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
                 
महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरु असली तरी, मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात मात्र अजूनही आज व उद्या दि. २-३ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही जाणवतेच.
                  
विशेषतः  मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगांव, छ. संभाजीनगर, उत्तर अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यापुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. ६ नोव्हेंबरपर्यंत केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असुन शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर पासुन काही दिवसाकरता पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते. 

शनिवार दि. ८ नोव्हेंबरपासुन हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी, लगेचच नाही, परंतु नोव्हेंबर महिन्यात, महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता अजूनही पुढे नाकारता येत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात अतिजोरदार थंडीची शक्यताही जाणवत नाही. वातावरणातील बदलानुसार तसे अवगत केले जाईल.
  
आज बं. उपसागरात ब्रम्हदेश व बांगलादेश किनारपट्टीदरम्यान पुन्हा नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असुन पुढील २ दिवसात त्या किनारपट्टीनेच ते वायव्ये दिशेकडे सरकण्याची शक्यता जाणवते. 

- माणिकराव खुळे 
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title : महाराष्ट्र मौसम: बारिश जारी, जल्द साफ आसमान की उम्मीद।

Web Summary : चक्रवात के पीछे हटने के बावजूद, महाराष्ट्र के कुछ हिस्सों में 3 नवंबर तक हल्की बारिश हो सकती है। 7 नवंबर से धीरे-धीरे मौसम में सुधार की उम्मीद है, जिसके बाद तापमान में गिरावट आएगी। बंगाल की खाड़ी में नया कम दबाव का क्षेत्र बन रहा है।

Web Title : Maharashtra Weather: Rain impact persists, clearer skies expected soon.

Web Summary : Despite cyclone's retreat, parts of Maharashtra may experience light rainfall until November 3rd. Gradual weather improvement expected from November 7th, with cooler temperatures following. New low-pressure area forming in Bay of Bengal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.