Join us

Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधार पाऊस धडकणार; 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:18 IST

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)

Maharashtra Rain Alert :राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Maharashtra Rain Alert)

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसा, राज्यभर पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Rain Alert)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचे स्वरूप तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.(Maharashtra Rain Alert)

कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागांत चक्री वारेही वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

नद्या व नाल्यांना पूर येऊ शकतो, किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छिमारांनी समुद्रकिनाऱ्याला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. पुणे शहरातील काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पावसामुळे घाट परिसरातील वाहतूक विस्कळीत होऊ शकते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल. ढगाळ हवामान राहणार आहे.

वादळी वारे व विजांमुळे पिके व फळबागांचे नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

विदर्भात नागपूर व गोंदियात रेड अलर्ट

विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार आहे. विशेषत: नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* शेतात व फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करा.

* विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात काम करू नका.

* वादळी वाऱ्यांपासून फळबागा व पिकांचे संरक्षण करा.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; घाटमाथ्यावर अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसविदर्भकोकणमराठवाडा