Lokmat Agro >हवामान > नाशिक, पुणे, कोकणात पावसाची तूट, मराठवाडा, विदर्भात भरपूर, राज्यात किती पाऊस? 

नाशिक, पुणे, कोकणात पावसाची तूट, मराठवाडा, विदर्भात भरपूर, राज्यात किती पाऊस? 

Latest News Maharashtra Rain 97 percent of the average rainfall in maharashtra till September 8 | नाशिक, पुणे, कोकणात पावसाची तूट, मराठवाडा, विदर्भात भरपूर, राज्यात किती पाऊस? 

नाशिक, पुणे, कोकणात पावसाची तूट, मराठवाडा, विदर्भात भरपूर, राज्यात किती पाऊस? 

Maharashtra Rain : यंदा राज्यात ८ सप्टेंबरपर्यतच्या सरासरीनुसार किती टक्के पाऊस झाला आहे. मात्र, ही परिस्थिती समसमान नसल्याचे दिसत आहे.

Maharashtra Rain : यंदा राज्यात ८ सप्टेंबरपर्यतच्या सरासरीनुसार किती टक्के पाऊस झाला आहे. मात्र, ही परिस्थिती समसमान नसल्याचे दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : यंदा राज्यात ८ सप्टेंबरपर्यतच्या सरासरीनुसार ९७ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, ही परिस्थिती समसमान नसल्याचे दिसत आहे. कारण, मराठवाडा, विदर्भात जरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी पश्चिम महाराष्ट्र, नाशिक व कोकण विभागात पावसाची तूट दिसून येत आहे.

कोकणातील तूट फारशी नसली तरी पुणे विभागात २५ टक्के तर नाशिक विभागात १८ टक्के पावसाची तूट आहे. आगामी काही दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, सप्टेंबरअखेरपर्यंत ही तूट भरून निघण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे, नाशिक मध्ये तूट
पुणे विभागात पावसाची सर्वाधिक तूट असून, त्यात केवळ सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत कमी ७० टक्के पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात ८२ टक्के पाऊस झाला आहे.

नाशिक विभागातही पावसाची एकूण १८ टक्के तूट 3 आहे. त्यात सर्वाधिक २५ टक्के तूट नंदुरबार जिल्ह्यात असून, या जिल्ह्यात केवळ ७५ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ८१ टक्के, अहिल्यानगरात ८२ टक्के पाऊस झाला आहे. तर धुळ्यात सर्वाधिक ९८ टक्के व जळगावात ९४ टक्के पाऊस झाला आहे.

राज्याची एकूण स्थिती
८ सप्टेंबरपर्यंत राज्यात एकूण ८७२ मिमी पाऊस होतो. यंदा ८ सप्टेंबरपर्यंत ८४७ मिमी पाऊस झाला आहे. ८ सप्टेंबरच्या सरासरीच्या ९७ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या पावसाची केवळ ३ टक्के एवढी तूट आहे. जून ते सप्टेंबरपर्यंतच्या एकूण सरासरीनुसार राज्यात आतापर्यंत ८४ टक्के पाऊस झाला आहे.

विभागनिहाय झालेला पाऊस (८ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस)

 विभागनिहाय झालेला पाऊस (८ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस)
 
  
विभागहोणारा पाऊसझालेला पाऊसटक्केवारी
कोकण  २५९२ मिमी२४५९ मिमी  २४ टक्के
नाशिक५९६ मिमी४८८ मिमी   ८२ टक्के
पुणे ८१९ मिमी ६१९ मिमी   ७५ टक्के
छत्रपती संभाजीनगर५५७ मिमी६१० मिमी१०९ टक्के
अमरावती६५३ मिमी६९१ मिमी१०९ टक्के
नागपूर९४३ मिमी९७९ मिमी१०३ टक्के

 

Web Title: Latest News Maharashtra Rain 97 percent of the average rainfall in maharashtra till September 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.