Maharashtra Dam Water Update : राज्यातील बहुतेक धरणे ९५% पेक्षा जास्त भरल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.(Maharashtra Dam Water Update)
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी ६:३० ते ७:०० या वेळेत सर्व आपत्कालीन दरवाजे ४.५ फूट उघडण्यात आले असून, एकूण ११३,१८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.(Maharashtra Dam Water Update)
राज्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून अनेक ठिकाणी पाणी साठ्याची टक्केवारी ९५ ते १०० च्या जवळ आहे. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता प्राप्त झालेल्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, बहुतांश धरणे जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरली आहेत. (Maharashtra Dam Water Update)
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, आवश्यकतेनुसार तो वाढविण्यात येणार आहे.(Maharashtra Dam Water Update)
जायकवाडी धरण – जवळजवळ १००% भरले
एकूण साठा : १०२.६८ TMC (९९.९६%)
उपयुक्त साठा : ७६.६२ TMC (९९.९५%)
गोदावरी नदीतून ११३,१८४ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
आजपर्यंत धरणातून सोडलेले एकूण पाणी अंदाजे ४२.८६ TMC इतके झाले आहे.
अहमदनगर विभाग
भंडारदरा, निळवंडे, आढळा, वडज यांसारखी धरणे १००% क्षमतेवर आहेत.
मुळा धरणाचा साठा ९९.५६%, तर माणिकडोह धरणाचा साठा ६८.७४% नोंदवला आहे.
नाशिक – जळगाव विभाग
दारणा, मन्याड, पांझरा, मुकणे, करंजवण आदी धरणांचा साठा ९८ ते १००% दरम्यान आहे.
गिरणा धरण ९९.२२% भरले असून, हतनुर धरणाचा साठा ५७.८४% इतका आहे.
पुणे विभाग
पानशेत, भाटघर, वीर, पवना आणि चासकमान धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
खडकवासला धरण ९६.८७% तर मुळशी धरण ९७.२५% भरले आहे.
कोयना व कृष्णा खोरे
कोयना धरणाचा साठा ९८.३६% आहे.
धोम, वारणा, राधानगरी, दूधगंगा धरणेही ८३% पेक्षा जास्त भरली आहेत.
अलमट्टी धरण (कर्नाटक सीमा) १००% क्षमतेवर पोहोचले आहे.
मराठवाडा विभाग
येलदरी, मांजरा, तेरणा, माजलगाव, पेनगंगा प्रकल्प ९५% पेक्षा अधिक भरले आहेत.
सिध्देश्वर ९७%, सिना कोळेगाव १००% भरले आहेत.
नागपूर – अमरावती विभाग
तोतलाडोह धरण ९७.६९% भरले असून, उर्ध्व वर्धा ९७.३९% आहे.
गोसीखुर्द धरणाचा साठा तुलनेने कमी (५२.८६%) आहे.
पर्जन्यमानाचा आढावा
कोकण आणि पश्चिम घाटातील धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.
महाबळेश्वरला आजवर ५,३२२ मिमी पाऊस, तर कोयना परिसरात ४,४६५ मिमी पाऊस नोंदवला गेला.
मराठवाड्यात जायकवाडी परिसरात ५५७ मिमी पाऊस नोंदवला आहे.
नदी पात्रातील विसर्ग
जायकवाडीसह गिरणा, हतनुर, उजनी, खडकवासला आणि पंढरपूर परिसरातून नियंत्रित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणातून २६ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
राज्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेच्या जवळ आहेत, त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध राहील.
जायकवाडी आणि उजनीसारख्या मोठ्या प्रकल्पांतून नदीपात्रात विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
(सौजन्य : इंजि.हरिश्चंद्र.र.चकोर जलसंपदा(से.नि.), संगमनेर)