Join us

Maharashtra Dam Water Level : राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:13 IST

Maharashtra Dam Water Level : राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या पावसामुळे राज्याच्या सरासरी जलसाठ्यात मोठी भर पडली असली तरी, मराठवाडा विभागात अद्यापही अपेक्षित साठा झालेला नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठीही ही स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. (Maharashtra Dam Water Level)

Maharashtra Dam Water Level :  राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. (Maharashtra Dam Water Level) 

यंदाच्या मुबलक पावसामुळे राज्याच्या सरासरी जलसाठ्यात मोठी भर पडली असली तरी, मराठवाडा विभागात अद्यापही अपेक्षित साठा झालेला नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठीही ही स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.(Maharashtra Dam Water Level) 

 राज्यातील विविध धरणांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्या अखेर ७२.७०% म्हणजेच १०४०.०७६ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.  ही माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जलसिंचन तज्ज्ञ इंजिनिअर हरिश्चंद्र चकोर यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ८% अधिक साठा झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.(Maharashtra Dam Water Level)

मागीलवर्षी याच कालावधीत पाणीसाठा  ६५.०७% (९३०.९२० टीएमसी) होता.(Maharashtra Dam Water Level)

यंदाच्या पावसामुळे धरणांमध्ये चांगला साठा तयार झाला असला, तरी सध्या पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आता पिकांच्या भरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.(Maharashtra Dam Water Level)

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक धरणे १००% भरतील असा अंदाज चकोर यांनी व्यक्त केला.

विभागानुसार पाणीसाठ्याची स्थिती 

विभागधरणांची संख्याउपयुक्त साठा (टी.एम.सी.)टक्केवारी (%)
कोकण१७३१११.२७०८५.००%
नाशिक५३७१४२.४९१६७.९७%
पुणे७२०४४४.९७२८२.८५%
मराठवाडा९२०१५२.९९६५९.६७%
अमरावती२६४८४.३७६६१.१८%
नागपूर३८३१०४.७०४६३.८५%

प्रमुख मोठ्या धरणांतील साठा

धरणाचे नावसाठा (टी.एम.सी.)टक्केवारी (%)
उजनी११६.४००९९.२८%
कोयना८७.४५०८३.०८%
जायकवाडी९६.३९०९३.८३%

विशेषत: जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात सुमारे २.०१४५ टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आले. सध्या दरवाजे बंद असून विसर्ग थांबविण्यात आलेला आहे.

(सौजन्य : सेवानिवृत्त इंजि हरिश्चंद्र र चकोर)

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस करणार कमबॅक; हवामान खात्याचा अलर्ट जारी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीजायकवाडी धरणमराठवाडाकोकणविदर्भ