Maharashtra Dam : राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून आता पुढील चार दिवस देखील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान राज्यातील बहुतांश धरणे काठोकाठ भरली आहेत. आज २८ सप्टेंबरपर्यंत धरणांची स्थिती काय आहे ते पाहूयात.
आज २८ सप्टेंबरपर्यंत जवळपास २३ धरण १०० टक्के भरली असून राज्यातील निम्म्याहून अधिक धरणं 99 टक्क्यांवर पोहोचले आहेत. यामध्ये उजनी, पवना, वीर, चासकमान, भाटघर, मोराबे, बारावे, तुलसी, विहार, मोडकसागर, पांझरा, मन्याड, गिरणा, करंजवण, विसापूर, खैरी, सीना, घा. पारगाव, मां. ओहोळ, डिंभे, वडज, आढळा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
तर गंगापूर धरण ९६.२५ टक्के, जायकवाडी धरण ९६.५१ टक्के, सीना कोळे धरण ८३.०८ टक्के, मांजरा धरण ९२.४५ टक्के, अलमट्टी धरण ९९.४३ टक्के, राधानगरी धरण ९७.८३ टक्के, कोयना धरण ९९.१६ टक्के, खडकवासला धरण ९१.८१ टक्के, हेटवणे धरण ९७.५४ टक्के, तर भंडारदरा आणि निळवंडे धरण ९९ टक्के भरले आहे.
कुठे किती पाऊस, हेही पाहुयात...
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ९०/५२६४, रतनवाडी : ९८/५३९७, पांजरे : ७/३२८७, भंडारदरा : ६६/२५५१, निळवंडे : ८३/११३१, मुळा : १२४/७००, आढळा : ४८/३६७, कोतुळ : ४०/५५५, अकोले : ६९/७९८, संगमनेर : ६२/५०५, ओझर : ७५/४८०, आश्वी : ९२/४३८, लोणी : १३०/४२९, श्रीरामपुर : ११०/६०४, शिर्डी : १७८/५७०, राहाता : २००/७१५, कोपरगाव : १२८/४९७, राहुरी : १०५/६७७, नेवासा: १०५/७१५, अहि.नगर : ७६/६४५.
-----------------------------------
नाशिक : ७१/१०६५, त्र्यंबकेश्वर : ११०/२७७६, इगतपुरी : १२७/४३७२, घोटी : १०५/३०१०, भोजापुर : २०/५३८.
-----------------------------------------
गिरणा (धरण) : ६०/८३५, हतनुर (धरण) : ३२/७०९, वाघुर (धरण) : ३२/५६७, जायकवाडी (धरण) : ४२/९२१, उजनी (धरण) : ४९/६९२, कोयना (धरण) : ४९/४६६७ , लोणावळा : ५०/५२७५ मुळशी : ४०/७३२३.
-------------------------------------------*
भातसा (ठाणे) : ०२/२९६२, सुर्या (पालघर) : २६९/४०७७, वैतरणा (नाशिक) : ७२/२४२६
--------------------------------------------
तोतलाडोह (नागपूर) : १८/११६६, गोसीखुर्द (भंडारा) : ३०/८४१.
--------------------------------------------
महाबळेश्वर : ६९/५५९०, नवजा : ४९/५८८८.
- इंजि. हरिश्चंद्र .र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.)