Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cold Weather Update : कडाक्याची थंडी परतली! महाराष्ट्रात गारठा वाढणार; वाचा IMD अलर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:59 IST

Maharashtra Cold Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढताना दिसत असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय घट होत आहे. पुढील २४ तासांत थंडीचा कडाका अधिक तीव्र होणार असून, काही भागांत पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Cold Weather Update)

Maharashtra Cold Weather Update : देशभरात हिवाळ्याचा जोर वाढत असून, पुढील २४ तासांत कडाक्याची थंडी आणि काही भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Maharashtra Cold Weather Update)

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक तीव्र होणार असून, दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या थंडीच्या लाटेचा परिणाम मध्य आणि दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही जाणवणार आहे.(Maharashtra Cold Weather Update)

उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा यलो अलर्ट

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, केंद्रीय हवामानशास्त्र विभाग(IMD) ने उत्तर भारतातील बहुतांश भागांसाठी दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे.

या धुक्याचा थेट परिणाम दृश्यमानतेवर होणार असून, वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबरपर्यंत थंडी आणि धुक्याची ही लाट कायम राहणार आहे. याच काळात पर्वतीय भागांमध्ये सक्रिय होत असलेल्या पश्चिमी झंझावातामुळे काही ठिकाणी पावसाचाही अंदाज असून, त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढू शकतो.

महाराष्ट्रात पुढील २४ तास महत्त्वाचे

महाराष्ट्रात सध्या अधिकृत थंडीची लाट सक्रिय नसली, तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात लक्षणीय घट होत आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून, आठवड्याच्या अखेरीस थंडीचाच प्रभाव अधिक राहील असा अंदाज आहे.

विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्र राहणार आहे. उर्वरित भागांत किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार दिसून येतील. काही ठिकाणी गारठा इतका वाढेल की पहाटे आणि रात्री घराबाहेर पडणे कठीण होऊ शकते.

मुंबई–नवी मुंबईतही गारठा

मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्येही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पहाटे आणि रात्री उशिरा थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा वाढला आहे. माथेरान, महाबळेश्वरसारख्या भागांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम कोकण किनारपट्टीपर्यंत जाणवत असल्याचे चित्र आहे.

कडाक्याची थंडी

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. तीन दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर गुरुवारी शहराचे किमान तापमान थेट १०.६ अंश सेल्सियसपर्यंत घसरले, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यावा लागला.

कमाल तापमानही २८ अंशांवर आल्याने दिवसाही वातावरणात गारठा जाणवत होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत किमान तापमान १२ ते १३ अंश, तर कमाल तापमान २९ ते ३० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून दाट धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. अचानक पडलेल्या या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नुकतीच लागवड झालेल्या कांदा आणि गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जरी धुक्याने वेढलेलं सकाळचं दृश्य मनमोहक दिसत असलं, तरी शेतीसाठी मात्र हे धुके धोक्याचं ठरत असल्याचं चित्र आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

* हवामान विभागाने नागरिकांना थंडीपासून संरक्षणाची योग्य काळजी घेण्याचे, तसेच धुक्याच्या काळात वाहन चालवताना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* शेतकऱ्यांनी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात तापमान घसरणीचा अलर्ट; पुढचे ४८ तास महत्त्वाचे वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Potential Impacts

Web Summary : Maharashtra's weather is changing. Stay updated on the latest weather forecasts. Be prepared for potential weather impacts. Get ready and stay safe during weather changes.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भपुणे