Lokmat Agro >हवामान > Khadakpurna Dam Water : खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakpurna Dam Water : खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

latest news Khadakpurna Dam Water: Khadakpurna project on the verge of 'overflow'; Alert issued to 33 villages | Khadakpurna Dam Water : खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakpurna Dam Water : खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakpurna Dam Water : बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखासागर उर्फ खडकपूर्णा प्रकल्पात दमदार पावसामुळे जलसाठा वेगाने वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तीन वक्रद्वारे १० सेंमीने उघडण्यात आले असून, नदीकाठच्या ३३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Khadakpurna Dam Water)

Khadakpurna Dam Water : बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखासागर उर्फ खडकपूर्णा प्रकल्पात दमदार पावसामुळे जलसाठा वेगाने वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तीन वक्रद्वारे १० सेंमीने उघडण्यात आले असून, नदीकाठच्या ३३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Khadakpurna Dam Water)

शेअर :

Join us
Join usNext

Khadakpurna Dam Water  : बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखासागर उर्फ खडकपूर्णा प्रकल्पात दमदार पावसामुळे जलसाठा वेगाने वाढला आहे. (Khadakpurna Dam Water)

खबरदारीचा उपाय म्हणून तीन वक्रद्वारे १० सेंमीने उघडण्यात आले असून, नदीकाठच्या ३३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(Khadakpurna Dam Water)

संत चोखासागर (खडकपूर्णा) हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन व पाणीपुरवठा प्रकल्प दमदार पावसामुळे 'ओव्हर फ्लो'च्या स्थितीत पोहोचला आहे. ९ आणि १० ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात जलसाठ्याची पातळी झपाट्याने वाढली. (Khadakpurna Dam Water)

सध्या प्रकल्पात ८४.४५ टक्के जलसाठा असून, पाणी पातळी ५२९ मीटर वर पोहोचली आहे. प्रकल्पाचा संकल्पित जलसाठा ९३.४० दलघमी आणि पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर आहे. सध्या उपलब्ध जलसाठा ७८.८८ दलघमी आहे.(Khadakpurna Dam Water)

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तीन वक्रद्वारे १० सेंमीने उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Khadakpurna Dam Water)

सतर्कतेचा इशारा मिळालेली गावे

निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु., डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागीले, निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खु., तडेगाव, राहेरी ब्र., ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली तसेच परिसरातील इतर गावे.

दरम्यान, जलाशयातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Isapur Dam Water level : इसापूर धरण फुल्ल; दोन गेट उघडून पैनगंगेत विसर्ग वाचा सविस्तर

Web Title: latest news Khadakpurna Dam Water: Khadakpurna project on the verge of 'overflow'; Alert issued to 33 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.