Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. (Jayakwadi Dam Water Release)
त्यामुळे जलसंपदा विभागाने बुधवारी सायंकाळी धरणाचे १८ दरवाजे दोन फूटाने उघडून तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेसने विसर्ग सुरू केला आहे.(Jayakwadi Dam Water Release)
बुधवारी सकाळी ८ वाजता १८ हजार ८६४ क्युसेस वेगाने विसर्ग सुरू होता. मात्र, दिवसभरात धरणात येणारी आवक सातत्याने वाढल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विसर्ग दुप्पट करण्यात आला.
सध्या गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलपातळी वाढत असून, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर रात्रीतून विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी किनाऱ्यावरील गावांमध्ये ग्रामपंचायती व स्थानिक प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.
जायकवाडी धरणाची सध्याची स्थिती
उघडलेले दरवाजे : १८
विसर्ग : ३७,७२८ क्युसेस
सकाळीचा विसर्ग : १८,८६४ क्युसेस
संभाव्य वाढ : पावसावर अवलंबून
सावधानतेचा इशारा
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात किंवा काठावर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
