Join us

Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरण ९६% भरले; १८ दरवाजांतून किती होतोय विसर्ग जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:47 IST

Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे.

Jayakwadi Dam Water :  राज्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण सध्या जवळपास तुडुंब भरले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक परिसरात व पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. (Jayakwadi Dam Water)

त्यामुळे शुक्रवारी (२२ ऑगस्ट) जायकवाडीच्या २७ पैकी १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडून तब्बल ४७ हजार १६० क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. (Jayakwadi Dam Water)

मात्र, शनिवारी (२३ ऑगस्ट) सकाळपासून उर्ध्व धरणातून पाण्याची आवक कमी झाली. दुपारी दोनच्या सुमारास आवक २४ हजार ४९४ क्युसेक इतकी झाली. त्यामुळे धरणाचा विसर्ग कमी करण्यासाठी दरवाजे अडीच फुटांवरून दीड फुटांवर आणण्यात आले.  (Jayakwadi Dam Water)

यानंतर सध्या २८ हजार २९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. (Jayakwadi Dam Water)

जायकवाडीची पाणीपातळी

सध्याची पाणीपातळी : ९६.२६ टक्के

धरणातून सुरू असलेला विसर्ग : २८ हजार २९६ क्युसेक

उघडे दरवाजे : १८

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र आवक घटल्याने विसर्ग नियंत्रित करण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाचा इतिहास

जायकवाडीत पाणी येण्यास १९७४ साली सुरुवात झाली.

पहिल्यांदा पाणी साठा १९७६ मध्ये जमा झाला.

धरणात प्रथमच ४० टीएमसी साठा झाला होता.

२०१२ साली सर्वात कमी साठा नोंदला गेला केवळ ७.६९ टीएमसी (१०%).

गेल्या ४९ वर्षांत जायकवाडी धरण तब्बल १५ वेळा १००% भरले आहे.

गेल्या वर्षी (२०२४) जायकवाडीतील दरवाजे ३१ जुलै रोजी उघडण्यात आले होते, तर ९ सप्टेंबर रोजी ६ दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग झाला होता.

सध्या जायकवाडी धरणातील पाणीपातळी समाधानकारक असल्याने मराठवाड्याच्या पाणीपुरवठा व सिंचनासाठी दिलासा मिळाला आहे. तथापि, पुढील काही दिवसांच्या पावसावर धरण व्यवस्थापन अवलंबून राहणार आहे.

गेल्या वर्षी जायकवाडीतून ९ सप्टेंबर रोजी सहा दरवाजे उघडून गोदापात्रात विसर्ग करण्यात आला होता. यंदा ३१ जुलैलाच १८ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. गेल्या ४९ वर्षात जायकवाडी पंधरा वेळेस शंभर टक्के भरले आहे.- मंगेश शेलार, शाखा अभियंता

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Release Update: जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीमराठवाडापाऊसगोदावरीनदी