Jaykawadi Dam Water Level : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात, विशेषतः घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Jayakawadi Dam Water Level)
दारणा धरणातून २२ हजार ५३० क्युसेक तर गंगापूर धरणातून ६ हजार ३४० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. याचा परिणाम गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या खेड्यांवर होत असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Jayakawadi Dam Water Level)
दरम्यान, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५.१६ टक्क्यांवर पोहोचला असून आज (२२ ऑगस्ट) सकाळी १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले आहेत. गोदापात्रात सुरुवातीला ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार असून, पाण्याच्या आवकनुसार विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. (Jayakawadi Dam Water Level)
जायकवाडी धरणाची स्थिती
पाणीपातळी : १५२१.१२ फुट
जिवंत पाणीसाठा : २०६५.८५३ दलघमी
सध्याचा साठा : ९५.१६ टक्के
प्रस्तावित विसर्ग : ९,४३२ क्युसेक
नाशिक जिल्ह्यातील पाऊस आणि विसर्ग
बुधवारी पहाटेपासून दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने घाटमाथ्यावरील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली.
दारणा धरण : विसर्ग २२,५३० क्युसेक
गंगापूर धरण : विसर्ग ६,३४० क्युसेक
नांदूरमध्यमेश्वर बंधारा : दुपारी चार वाजेपर्यंत ९,४६५ क्युसेक विसर्ग
या सर्व पाण्याचा प्रवाह पुढे जायकवाडीच्या दिशेने होत असल्याने धरणाची जलपातळी झपाट्याने वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील साठा (%)
दारणा : ८६.४१%
गंगापूर : १००%
वाघाड : ९२.३७%
कश्यपी : १००%
गौतमी : ९६.३७%
आळंदी : १००%
करंजवण : १००%
भावली : १००%
मुकणे : १००%
वालदेवी : १००%
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे धरणांतून मोठा विसर्ग सुरू असून, जायकवाडीचे १८ दरवाजे आज उघडले जात आहेत. यामुळे गोदावरी व दारणा नदीकाठच्या खेड्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व नांदेड जिल्ह्यातील गोदापात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे, कारण विसर्ग परिस्थितीनुसार वाढविला जाऊ शकतो.- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता