Nashik Rain : मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार दि. २४, २६ व २७ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. त्यानुसार मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
तसेच दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (यलो अलर्ट) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (२३.०९.२०२५ रोजी आरएमसी मुंबईव्दारे जारी केलेल्या जिल्हास्तरीय अंदाज आणि चेतावणीवर आधारित).
हवामानावर आधारित कृषीसल्ला
- हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व झालेल्या खरीप पिकांची कापणी, मळणी, व फवारणीच्या कामांचे नियोजन करावे.
- तसेच कापणी केलेल्या पिकांना ताडपत्रीने झाकून ठेवावे.
- नवीन लावलेले फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बांबू किंवा काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
- पावसाचा व विजांचा अंदाज लक्ष्यात घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे विजांच्या कडकडाट पासून संरक्षण करावे.
- काढणी केलेल्या मुग व उडीद पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.
पशुधन (गाय, म्हैस) :
- विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
- पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
- जोरदार पावसापासून पशुधनाचे संरक्षण करावे व त्यांना चारण्यास किंवा इतर कारणास्तव बाहेर नेण्यास टाळावे.
- जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी चुन्याचा वापर करावा.
- पाऊस व विजांपासून पशुधनाचे संरक्षण करावे व त्यांना चारण्यास किंवा इतर कारणास्तव बाहेर नेण्यास टाळावे.
- प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेतीच्या उपकरणांपासूनदूर ठेवा.
- आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष्य ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा
- गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना विजांचा कडकडाटपासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
- जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावे.
- पावसाचे वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावे.
- गोठ्यातील छत आणि भिंती धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात.
- जनावरे पाण्यात असतील तर तात्काळ त्यांना बाहेर काढा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी