Gangapur Dam : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Water Storage) धरणांत समाधानकारक जलसाठा असून आजमितीला २८.३६ टक्के आहे. तर मागील वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील धरणांत (Nashik Dam Storage) १९.२१ टक्के इतका जलसाठा होता. सद्यस्थितीत गंगापूर धरणांत ४६.४१ इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
सध्या सर्वदूर अवकाळी पाऊस (Avkali Paus) हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे काहीच दिवसांवर मान्सून येऊन ठेपलेला आहे. तत्पूर्वी मे महिन्याच्या १६ तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणांत २८.३६ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गंगापूर धरण (Gangapur Dam) ४६.४१ टक्क्यांवर असून मागील वर्षी याच दिवशी ३०.९६ टक्के होते. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा १६ टक्के अधिक असल्याचे दिसून येते. तर धरणांमध्ये मागील वर्षी १९.२१ टक्के जलसाठा होता, त्यानुसार जिल्ह्यातील धरणांत मागील वर्षीपेक्षा यंदा ९ टक्के जलसाठा अधिक आहे.
जिल्ह्यातील धरण समूहांचा साठा पाहिला असता गंगापूर धरण समूहात ३३.६२ टक्के, पालखेड धरण समुहात १२.७९ टक्के, दारणा धरण समूहात ३३.९५ टक्के, गिरणा खोऱ्यात २८.१३ टक्के तर ओझरखेड धरण समूहात १६.२५ टक्के असा एकूण जिल्ह्यातील धरणात २८.३६ इतका जलसाठा शिल्लक आहे.
असा आहे जलसाठा
नाशिक जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा पाहिला असता गंगापूर धरणात ४६.२१ टक्के, कश्यपी धरणात २९.२१ टक्के, आळंदी धरणात ११.७६ टक्के, पालखेड धरणात १७.३० टक्के, ओझरखेड धरणात २३.२० टक्के, दारणा धरणात ३४.६५ टक्के, भावली धरणात ८०.९७ टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात ९७.६७ टक्के, भोजापूर धरणात शून्य टक्के चणकापूर धरणात २४.९७ टक्के, गिरणा धरणात २८.०४ टक्के तर माणिकपुंज धरणात शून्य टक्के असा जलसाठा सद्यस्थितीत आहे.