Nashik Cold Wave : दि. ०१ व ०२ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच जिल्ह्यातील घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी (यलो अलर्ट) थंडीच्या लाटेची शक्यता आहे. या काळात द्राक्षबागेसह डाळिंब आणि हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
द्राक्षे व डाळिंब
कमी तापमानामुळे झाडाची नाजूक पाने जळतात.
द्राक्ष घडातील मण्यांची फुगवण होण्यास अडथळा निर्माण होतो.
कडाक्याच्या थंडीमुळे मणी फुटण्याची समस्या उद्भवते.
कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षाचे मणी गुलाबी रंगाचे (गुलाबी बेरी) दिसतात.
मंद वाढ.
थंडीपासून रब्बी पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी / तुषार सिंचन च्या सहाय्याने द्यावे.
द्राक्ष व डाळिंब बागेत धूर किंवा बागेला गोणपाट किंवा साडीने किंवा शेड नेट बांधून थंडी पासून संरक्षण करावे.
थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार/तुषार सिंचनच्या सहाय्याने पाणी द्यावे.
हरभरा
मंद वाढ. बहुतेक पिकाचा कोवळा भाग प्रभावित होण्याची शक्यता असते.
हरभरा सारख्या संवेदनशील पिकांचे दंव प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी, सल्फ्यूरिक ऍसिड @ 0.1% (1 लिटर H2SO4 1000 लिटर पाण्यात) किंवा थायोरिया @ 500 पीपीएम (500 ग्रॅम थायोरिया 1000 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करा.
संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी / तुषार सिंचन च्या सहाय्याने द्यावे.
फळ पिके
कमी तापमानामुळे इजा
नवीन फळझाडांचे रोपे सरकंदा / पेंढा/ पॉलिथिन शीट/बारीक पिशव्याने झाकून ठेवा.
पशुधन
- नवजात वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण. कामी तापमानाचा प्रभाव दूध उत्पादन कमी तसेच जनावरांच्या शरीर विज्ञानावर प्रभाव
- दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा आणि थंडीचा ताण टाळण्यासाठी पडदे वापरा.
- गुरे व शेळ्यांना रात्रीच्या वेळी शेडमध्ये ठेवा आणि त्यांना थंडीच्या लाटेपासून वाचवण्यासाठी कोरडे अंथरूण (गोणपाट इ.) द्या.
- त्यासाठी जनावरांच्या गोठ्यांना बारदान / शेडनेटचे पडदे
- लावावेत. तसेच गोठय़ामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० व्हॅटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावीत.
- शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी.
- गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत / कडबा / गोणपाट यांची बिछायत टाकावी.
- गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
- ग्रामिनर कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
