जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागला.
जायकवाडी प्रकल्पाची एकूण पाणी संचय क्षमता १०२ टीएमसी तर जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ७६ टीएमसी आहे. यावर्षी मे महिन्यापासून दिवाळीपर्यंत पाऊस पडला. मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला.
यानंतर पावसाळ्यातील चार महिन्यांतही चांगला पाऊस झाला. पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पावसाचा फटका दिवाळीत बसला. मराठवाड्यासोबतच शेजारील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने तेथील धरणे ऑगस्ट महिन्यातच भरली होती.
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रासह उर्ध्व भागातील दोन्ही जिल्ह्यांतून सतत पाण्याची आवक सुरू होती. यामुळे प्रकल्प ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच धरण ९० टक्के भरले होते.
उर्ध्व भागातून सतत पाण्याची आवक होत असल्याचे पाहून पाटबंधारे विभागाने गोदापात्रात आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण याच पाण्याने भरण्यात आले.
जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातून पाण्याची मोठी आवक झाली. शिवाय पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला होता. यामुळे यंदा १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागला. प्रकल्प आजही पूर्णपणे भरलेला आहे. जलाशय मंजूर परिचलनानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात आला. - प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प.
...म्हणून केला विसर्ग
• सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस पडल्याने पाण्याचा विसर्ग करणे प्रशासनाला बंधनकारक झाले.
• जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जूनपासून आजपर्यंत तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग प्रकल्पातून करण्यात आला.
• प्रकल्पाचा जिवंत आणि मृत एकूण पाणीसाठ्याची क्षमता १०२ तर जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ७६ टीएमसी आहे. याचा विचार करता यंदा जायकवाडीतून सोडलेले पाणी हे जिवंत साठ्याच्या अडीच पट आहे.
हेही वाचा : हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती
Web Summary : Heavy rains in Nashik and Ahilyanagar districts led to massive inflow into Jayakwadi Dam. Consequently, 171 TMC of water was released since June, exceeding the dam's live storage capacity by 2.5 times. The dam remains full, with releases managed according to operational guidelines.
Web Summary : नाशिक और अहिल्यानगर जिलों में भारी बारिश के कारण जायकवाड़ी बांध में भारी आवक हुई। परिणामस्वरूप, जून से 171 टीएमसी पानी छोड़ा गया, जो बांध की लाइव स्टोरेज क्षमता से 2.5 गुना अधिक है। बांध अभी भी भरा हुआ है, और परिचालन दिशानिर्देशों के अनुसार पानी छोड़ा जा रहा है।