Join us

Koyna Dam Water Update : कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस; धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:57 IST

Koyna Dam Water Level कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

वारणा, कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाचीपाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच कोयना धरणातून ३१ हजार ७४६ क्युसेक, तर वारणा धरणातून १५ हजार ७५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Koyna Dam कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोयना धरण परिसरात चौवीस तासांत २०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे, तसेच वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरूच आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

कोयना धरणात सध्या ८५.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसात सहा फुटांनी वाढून १९ फुटांवर गेली होती.

जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, पलूस तालुक्यातील नागठाणे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊसकोयना पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणात सायंकाळपर्यंत ८५.३० टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडले. यामुळे कोयना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कोयना व कृष्णा नदीची पातळी वाढत आहे.

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही

टॅग्स :कोयना धरणपाणीपाऊसधरणनदीसांगली