lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > किकुलॉजी : अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट 

किकुलॉजी : अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट 

Kikulogy: Farming economy flourishes with latest electronics technology says prof Kirankumar Johare | किकुलॉजी : अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट 

किकुलॉजी : अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट 

(किकुलॉजी, भाग ११): शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. आजच्या सदरात विशेष संवाद शेतकऱ्यांच्या मुलांशी...

(किकुलॉजी, भाग ११): शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. आजच्या सदरात विशेष संवाद शेतकऱ्यांच्या मुलांशी...

शेअर :

Join us
Join usNext

मान्सून पॅटर्न बदललेला असतांनाच ८०० कोटी जागतिक लोकसंख्येपैकी १५० कोटी भारतीय लोकसंख्येचे पोट भरण्याचे व अन्नसुरक्षिततेचे आव्हान आपल्यापुढं आहे. पृथ्वीवरील २१ टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार हे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानासह आहेत. जगातील एक लाख आर्थिक श्रीमंत व्यक्तींची यादी काढली तर सर्व लोक हे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीशी जोडलेले किंवा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगधंद्यात आर्थिक गुंतवणूक करीत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. सर्व शिक्षणशाखा ज्ञानार्जन करण्यासाठी उत्तम आहेत. मात्र इलेक्ट्रॉनिक्स हा कृषी आर्थिक उन्नतीसाठी हायवे म्हणजे राजमार्ग आहे. 

रोबोटिक्स व कोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे आयओटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय यांच्या वापरातून नवनवीन कृषी रोजगार उपलब्ध होत आहेत. आपला कृषी संपन्न आत्मनिर्भर भारत आपणच घडवायचा आहे, तो घडविण्यासाठी परग्रहावरून एलियन्स शेती करण्यासाठी येणार नाहीत. ते काम आपल्यालाच करायचे आहे.

केंद्र सरकारने कृषी सुबत्ता असलेल्या नाशिक जिल्ह्यातील एक हजार एकर जमिनीवर ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर करीत इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड क्लस्टर बनवित नाशिक आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले आहे,  ज्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील युवापिढीने घ्यावा.

किकुलॉजीचे हेही भाग वाचा

  1. किकुलॉजी : 'विषुवदिनानिमित्त समजून घेऊ शेती आणि प्रकाशाचे महत्त्व
     
  2. किकुलॉजी : हवामान सजग व्हायचेय, तर ओझोनच्या अद्भुत इलेक्ट्रॉनिक संरचनेची माहिती हवीच
  3. किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

  4. किकुलॉजी : 'चांद्रयान ३' मोहीम, बदलणारे हवामान आणि चंद्रावरच्या शेतीची गरज 

  5. किकुलॉजी- इलेक्ट्रॉन देतो हवामान अलर्ट, वीज ठरवते पीकांची वाढ

  6. पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

  7. अचूक हवामान माहितीसाठी माठ आहेत हवामान शास्त्रज्ञ!

  8. किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?

  9. किकुलॉजी : 'जेट स्ट्रिम'मुळे भाजून निघतेय अमेरिका, चीन आणि युरोप! 

  10. किकुलॉजी : महाराष्ट्रासह उत्तर भारतावर 'भूकंपाचे ढग आणि धुके’

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या युवक युवतींना स्वतः ॲग्रीइंडस्ट्री सुरू करण्याची व जगात श्रीमंत व्यक्ती होण्याची दुर्मिळ संधी आहे. आर्थिक, मानसिक, बौद्धिक, कृषी स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान हा विषय समजून घेणे व उपयोगात आणणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे कौशल्य विकासाने कृषी आत्मनिर्भर भारत घडेल.

विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान अवगत करीत सामाजिक व राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यासाठी ॲग्रीकल्चर इंडस्ट्री उभारावी. आत्मनिर्भर भारतासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करावे. वेगाने तंत्रज्ञान बदलत असतांनाच नैतिक मार्गाने नफा कमविणे हे पाप नाही हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. 

ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजचा खजाना!
ब्रेन टू कॉम्प्युटर इंटरफेसिंग म्हणजे बीसीआय, बिझनेस डेटा एनेलेटिक्स, मशीन लर्निग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, ब्लॉकचेन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, डेवऑप्स, हायपर एटोमेशन, व्हर्च्युअल रियालिटी, एग्युमेंटेड रियालिटी, पीएलसी, स्काडा आदी विविध एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीजच्या एकत्रित वापरातून राष्ट्रीय व सामाजिक समस्या व शेतीतील तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापर आवश्यक आहे. अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट हे नजिकच्या वर्तमान आहे.

-प्रा. किरणकुमार जोहरे,
इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग,
के.टी.एच.एम.कॉलेज, नाशिक
9168981939, 9970368009
kirankumarjohare2022@gmail.com

Web Title: Kikulogy: Farming economy flourishes with latest electronics technology says prof Kirankumar Johare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.