lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

Cuckoo is a rain 'biotronics sensor' revels prof kirankumar johare in kikulogy | पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

(किकुलॉजी-भाग ४) शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन!

(किकुलॉजी-भाग ४) शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन!

शेअर :

Join us
Join usNext

मल्हार राग, कोकिळगान, रोमान्स व भारतीय मान्सून या तीनही गोष्टींचा परस्परसंबंध जितका अद्भुत तितकाच रंजक! तसेच नैसर्गिक विज्ञान देखील आहे हे किती जण जाणतात? एखादी गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर 'वेरीफाय' न करता 'अंदाजे दिवास्वप्ने' पाहणे हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत घातक ठरते. बऱ्याचदा कुणीतरी जीव ओतून आटोकाट प्रयत्न करीत असते, परंतु खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलून तुम्हाला बसविणारे भाट 'अर्थव्यवस्था' उद्ध्वस्त करते याची जाणीव किंवा कल्पना येईपर्यंत बराच उशीर होतो. मान्सून पॅटर्न बदलामुळे नैऋत्य मान्सून हा यंदा पुर्वेकडून आला असे 'अद्भुत ज्ञानगान' कोकिळ कधीच करीत नाही. 'रियल रोमॅन्टिक सायंटिफिक' लेख प्रपंच यासाठीच!

जगाच्या नकाशावर इतिहासात देखील 'प्रुव्हन ट्रुथ' आहे. असे असले तरी एक शास्त्रज्ञ तुमच्या फायद्यासाठी 'मेघ-मल्हार' गातोय यांची तुम्हाला कल्पना तरी आहे का? मेघमल्हार राग गाणारा कोकिळ पक्षी हा खरंतर वफादार 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' आहे हे कितीजणांना माहिती आहे? 'रोमान्स' हा देखील हवामान, मान्सूनचा पाऊस यांच्यातील होणाऱ्या बदलांची अचूक माहिती देण्यासाठी एखाद्या नैसर्गिक 'सेन्सर'सारखे आश्चर्यकारक काम करणारे विज्ञान आहे हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेल! तुम्ही थक्क व्हाल! 

मेघमल्हार!
अभिजात भारतीय गायन-वादन संगीत प्राचीन भारतातील वेदांतील हिंदू जप मंत्रातून विकसित झाले. तर संगीतातील २०० रागापैकी एक राग कर्नाटक शैलीत माधमावती म्हणून ओळखतात तोच हा - मल्हार राग! हिंदुस्थानी गायन-वादन संगीतात सुखदायी-मधुर व गंभीर वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे ते केवळ मल्हार रागात!
मल्हार रागाबद्दल समजून घ्यायला हवे. मल्हार म्हणजे पाऊस! भारतीय मान्यतेनुसार प्रत्येक रागाचे स्वतःचे स्वरूप व गाण्याचा हंगाम निश्चित आहे. हवामानाचा विचार केला तर वायव्य भारतातील उन्हाळ्याच्या हंगामात उष्णता वाढल्याने कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झालेल्या वेळी तो आळविला जाई.

प्राचीन काळापासून गायला जाणाऱ्या मल्हार रागाबद्दल असा विश्वास आहे की मल्हार रागाची गाणी गायली की विशिष्ट काळाने पाऊस पडतो. तानसेनच्या 'मिया के मल्हार' गाण्यामुळे कोरड्या प्रदेशातही पाऊस पडत असे मानले जायचे. तानसेन आणि मीरा हे मल्हार रागातील गाणी गाण्यासाठी प्रसिद्ध होते. यांचे साधे सोपे शास्त्रीय कारण म्हणजे मानवी कानांना ऐकू येणारी २० हर्ट्झ ते २० हजार हर्ट्झ फ्रिक्वेन्सी अशी ध्वनी ऊर्जा (Sound Energy), २० हर्ट्झ फ्रिक्वेन्सीच्या अलीकडे असणारी इन्फ्रा साउंड ऊर्जा (lnfrasound Energy) तसेच २० हजार हर्ट्झ फ्रिक्वेन्सीच्या पलीकडे असणारी आणि कुत्रा, मांजर, वटवाघूळ आदी पशूपक्षी ऐकू शकतात अशी अल्ट्रा साउंड ऊर्जा  (Ultrasound Energy) ही वातावरणातील ढगांच्या एकंदर निर्माण प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक आहे त्याबद्दल अधिक अभ्यास संशोधन होणे गरजेचे आहे.

कोकिळ
कोकिळ (Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus)) जोडीबद्दल समजून घेऊया! भारतासह आशियाखंडात पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, चीन, श्रीलंका इतकेच नव्हे तर सन १९८० मध्ये सिंगापूर व ऑस्ट्रेलियात देखील कोकिळ पक्षी आढळतो. 

कोकिळगान
कोकिळगान हे मल्हार रागापेक्षा कमी नाही. १९८३ साली रिलिझ झालेल्या हीरो चित्रपटातले गीत “निंदिया से जागी बहार, ऐसा मौसम देखा पहिली बार, कोयल कूके कूके गाये मल्हार ...” ऐकले असेल. नर कोकीळ पक्षी जे गीत गातो ते म्हणजे 'मल्हार राग'च होय असे मानतात. 'रोमॅंटिक' वातावरणातच कोकिळ गातो हे विज्ञान आहे. 

मुडी निसर्गचक्रासाठी 'कोकिळगान' होते. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. मादीला म्हणजे कोकिळेला आकर्षित करण्यासाठी प्रणयासाठी साद नर कोकिळ घालतो. मुड आला कि कोकिळ वेळेकाळाचे भान न ठेवता जितका 'डेस्परेट' होतो तितका बेछूट होत कर्णकर्कश 'गानम्युझिक' वाजवतो.

'रोमान्स'धारा!
कोकिळगान व भारतीय मान्सून या तीनही गोष्टींचा अद्भुत परस्पर संबंध आहे. वर्षभर कोकिळ कडे ढुंकूनही न बघणारी कोकिळा मान्सून येण्याआधी ठरवून समागमानंतर ठराविक काळात ठराविक संख्येनेच हवामानानुसार अंडी घालण्याचा, वेळप्रसंगी 'अबॉर्ट' करण्याचा निर्णय घेते. 'रोमान्स'धारा केव्हा येणार हे कोकिळ व कोकिळा या दोघांना माहीत असते.

स्ट्रेटेजिक प्लॅनिंग
एखादी घटना घडण्याच्या आधी परिस्थितीचा वेध घेत केलेल्या कृती, घेतलेले सुयोग्य निर्णय, उपाययोजना यांना 'स्ट्रेटेजिक प्लॅनिंग' असे म्हणतात. नर कोकिळ पक्षी आणि मादी कोकिळा ही जोडी 'स्ट्रेटेजिक प्लॅनिंग' मध्ये मानवी सभ्यतेच्या पुढे आहे. माणसांसारखे अनावश्यक वस्तू, पैसाअडका जमविण्यात आनंदायी जीवनाचे क्षण गमावत डिप्रेशनमध्ये आत्महत्या कोकिळ किंवा अन्य पक्षी करीत नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवे.

कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबविण्यासाठी गुपचूप देते. १२ ते १४ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे कोकिळ पक्षाचे खाद्य असल्याने मांसाहार व शाकाहारही आहे. उपलब्ध परिसरातील लहान सहान किडे-अळ्या हे मुख्य खाद्य खात साधारणतः २० ते २८ दिवसांनी पिले उडण्यालायक होतात. यावेळी पिल्लांची भुक शमवण्यासाठी फळे, जास्त अळ्या व उडणाऱ्या कीटकांची उपलब्धता गरजेची असते. जे मान्सूनच्या पावसानंतरच किती उपलब्ध होणार याचे उपजत ज्ञान कोकिळेला असते. कोकिळेने अंडी दिली की, किमान ३२ दिवस ते ४२ दिवस म्हणजे दीड महिना कालावधीनंतर मान्सूनच्या पावसाची रिपरिप होते आणि ९० दिवसांपर्यंत ती जास्त वाढते. 

माणसांपेक्षा कोकिळ-कोकिळा पक्षांच्या जोडीचे 'अॅडव्हान्स फॅमिली प्लॅनिंग' असते. कोणत्या हंगामात मादी रिस्पॉन्स देईल हे कोकिळ जाणतो म्हणून उगीचच वर्षभर कोकिळ गात नाही. म्हणूनच कोकिळ पक्षी हा खरा हवामान शास्त्रज्ञ देखील आहे. 

चैतन्यमय ऋतू चक्र
तापमान, वायूदाब, निगेटिव्ह आयनची वातावरणातील मात्रा, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यांच्या विशिष्ट संतुलनातील पावसाळ्याआधी येणाऱ्या उन्हाळ्याच्या शालेय सुट्टीत कडक उन्हाने घरात बसून बोर होत असतांना अनेकांनी ही साद ऐकली असेल. विशिष्ट हंगामातच हे घडते. भारतीय ऋतूचक्र चैतन्यमयी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो.

'मान्सूनचे कोकिळगान' ऐकत घामाघूम होत बांधावर राबणाऱ्या गावाकडला शेतकऱ्यांचा 'अंदाज' एसी कॅबीन मधून बाहेर निघत जनहितासाठी समजून घ्यायला कुणाची हरकत नसावी. शहरातून मान्सून आला अशी खरी-खोटी पावसाची सूचना देण्याआधी अधिकृत विद्वानांची 'विशेष टूर' गावाकडे गेली तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूतीचा प्रवास नक्कीच आनंददायी ठरेल याबद्दल शेतकऱ्यांचे देखील दुमत नसावे.

चावडीवरचे पारंपरिक विज्ञान
कोकिळा आपले एकुलते एक अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालते. कावळ्याच्या घरट्याची उंची, दिलेल्या अंड्यांसंह एकूण संख्या पाहून भारतातील मान्सूनचा पाऊस कधी व कसा होणार हे ठरते. भारतात अनेक गावात आजही पिकनिवड व नियोजन चावडीवर किंवा पिंपळपारावर ठरते ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रात शहरांमध्ये 'स्पोर्टस स्पिरीट' म्हणतात ते महाराष्ट्रात गावागावांतील शेतकऱ्यांत धैर्याने दुबार व कदाचित नंतर बार-बार पेरणीच्या तयारीत दिसतेय. अशावेळी कुणी विना अनुदानित विनामोबदला 'अंदाज नव्हे माहिती' देत वर्षानुवर्षे कुणी गीत गात असेल तर किती काळ दुर्लक्ष करावे?

अर्थव्यवस्था तारक 'कोकिळ'!
राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूतीसाठी हवामान शास्त्रज्ञांनी शहरातून गावाकडे जाण्याचा शासकीय आदेश निघणे अद्याप बाकी आहेत हे वास्तव आहे. कावळ्याच्या घरट्यात किती अंडी व कोकिळेने केव्हा दिली हे अधिकृतपणे मोजावे असे जाहीर झाले, तर अंदाज नव्हे तर मान्सूनच्या पावसाची अचूक माहिती बांधावर शेतकऱ्यांना मिळू शकेल. देशाची अन्नसुरक्षितता व अर्थव्यवस्था तारणहार हे पक्षपात न करता खरी माहिती देणारे हवामान शास्त्रज्ञच असतात. रोमान्स करणारा कोकिळ हा खरा अद्भुत हवामान शास्त्रज्ञच आहे हे वैज्ञानिक सत्य आहे. मग तुमच्या 'अर्थपूर्ण' बागेतील अधिकृत कोकिळ गातोय का खराखुरा 'मेघमल्हार' राग? हे शेतकऱ्यांनी शोधावे! ...आणि हवामान सजगही व्हावे !

प्रा. किरणकुमार जोहरे 
(आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ) 
संपर्क : 9168981939, ई-मेल : kirankumarjohare2022@gmail.com

Web Title: Cuckoo is a rain 'biotronics sensor' revels prof kirankumar johare in kikulogy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.