Join us

आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 08:49 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. त्यानुसार गुरुवारी मुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात वळीवाच्या पावसाची शक्यता ११ मेपर्यंत कायम आहे. रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत याचा प्रभाव राहील.

हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता कायम आहे, तर महामुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारनंतर ओसरेल.

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही.

पहाटेच्या किमान तापमानात घटचंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ ४ ते ६, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा ३ ते ५, जळगाव ६.५, अलिबाग ५.८, डहाणू ५.२, कुलाबा ३.७, सांताक्रूझ २.४ डिग्रीने खालावले. तापमानाची स्थिती १२ मे टिकून राहील.

अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसगारपीटमुंबईमहाराष्ट्रमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूककोकण