नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून या चारीला उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे गवंडगाव व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन मिळावे, या पार्श्वभूमीवर गावंडगाव व परिसरातील नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. ज्यानंतर कार्यकारी अभियंता भागवत यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याने पालखेड कॅनॉलमधून या चारीमध्ये पाणी सोडण्यात आले.
दरम्यान पालखेड कॅनॉल येथे दिलीप खैरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे गावंडगाव व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पालखेड कॅनॉल येथे जलपूजन करण्यात आले.
उन्हाळी आवर्तन सुरू झाल्यामुळे गवंडगावसह परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागात उन्हाळ्यामध्ये कायमच पाणीटंचाई भासत होती.
हेही वाचा : हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय
Web Summary : The Palkhed canal in Yeola, Nashik, has resumed summer water supply after years, easing water woes for Gavandgaon and surrounding areas. Local leaders intervened, ensuring the canal's reopening, bringing relief to farmers and residents facing persistent water scarcity.
Web Summary : नाशिक के येवला में पालखेड़ नहर में वर्षों बाद गर्मी में पानी की आपूर्ति फिर से शुरू हो गई है, जिससे गवंडगांव और आसपास के इलाकों में पानी की समस्या कम हो गई है। स्थानीय नेताओं ने हस्तक्षेप कर नहर को फिर से खुलवाया, जिससे पानी की कमी का सामना कर रहे किसानों और निवासियों को राहत मिली।