Join us

'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; पुढील तीन दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:39 IST

Shakti Cyclone बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे.

नवी दिल्ली: बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे.

अशातच बंगालच्या उपसागरात २३ मे ते २८ मेदरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.

संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल. १६ ते १८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते, 

पावसाची कधी आणि कुठे शक्यता?◼️ हवामान विभागाने १६ मेपर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.◼️ कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे.◼️ तसेच, पुढील २४ तासांसाठी कोलकात्यात संध्याकाळी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.◼️ १३ आणि १४ मेदरम्यान गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अंतर्गत कर्नाटकात; तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, आंध प्रदेशातील किनारी भाग आणि यानम येथेही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा: ८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

टॅग्स :हवामान अंदाजचक्रीवादळपाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजकोकणमहाराष्ट्रमराठवाडा