Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणांत सध्या ४३ टक्के पाणीसाठा; जाणून घ्या विभागनिहाय आकडेवारी स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:53 IST

राज्यातील एकूण तीन हजार धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा (४३.८७ टक्के) उपलब्ध असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी (३७.२४ टक्के) होता.

राज्यातील एकूण तीन हजार धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा (४३.८७ टक्के) उपलब्ध असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी (३७.२४ टक्के) होता.

पुणे विभागात सर्वाधिक २०६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, सर्वांत कमी ६१ टीएमसी पाणीसाठा कोकण विभागात उपलब्ध आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती.

विभागनिहाय पाणीसाठा (आकडे टीएमसीमध्ये)

विभागयंदाचा साठागेल्यावर्षीचा साठा
कोकण ६१.२४ ६२.९२ 
अमरावती७३.७२ ६५.१३ 
नागपूर८०.७९ ६३.४० 
नाशिक १०१.९६ ८९.२८ 
छत्रपती संभाजीनगर१२९.३७ ९७.०९ 
पुणे २०६.५५ १७४.०४ 

यावर्षी साडेसहा टक्के जादा साठा

१५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल रोजी ६५३.६३ टीएमसी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. त्यानुसार राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्टअखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्यासाठी काटकसरीचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Dams: Current Water Storage at 43%; Division-wise Figures

Web Summary : Maharashtra's dams currently hold 43% water capacity, exceeding last year's levels. Pune division has the highest storage, while Konkan has the lowest. Concerns about El Nino's impact prompt water conservation measures, recalling drought experiences from 2014 and 2015.
टॅग्स :पाणीनदीधरणशेती क्षेत्रमहाराष्ट्र