पुणे : नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आज (दि. १३) मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात, दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
राज्यात पावसाच्या हजेरीमुळे कमाल तापमानाच्या पाऱ्यात काहीसे चढ-उतार होत आहेत. पुढील दोन दिवस कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे
- राज्यात पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
- पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा: मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर