Join us

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 08:42 IST

Maharashtra Weather Update विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे : विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट झाली.

मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे.

तापमानाची चाळिशीमराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील दोन दिवसांत परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

अधिक वाचा: Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसतापमानविदर्भमहाराष्ट्रलोहगावहिंगोलीपुणे