हवामानातील उल्लेखनीय घडामोडींमुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून काही भागांत गारपीट होत आहे.
हे बदल पुढील २४ तास कायम राहणार आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही अवकाळी पावसाची हजेरी लागेल.
तर, मुंबईतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात घसरण झाली आहे.
या जिल्ह्यांत बरसणारसोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्येही पावसाची शक्यता आहे.
राज्यात ७ हजार हेक्टरला फटका◼️ दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा ११ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांना फटका बसला आहे.◼️ यामध्ये सुमारे ७ हजार हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, आंबा तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा: अवकाळी व गारपिटीमुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' जिल्ह्याला सर्वाधिक फटका
Web Summary : Maharashtra faces unseasonal rain and hailstorms. The next 24 hours will bring rain to Marathwada, Vidarbha, and Mumbai. Crop damage across 11 districts affects 7,000 hectares, hitting farmers hard. Temperature decrease expected.
Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश और ओलावृष्टि का प्रकोप। अगले 24 घंटों में मराठवाड़ा, विदर्भ और मुंबई में बारिश होगी। 11 जिलों में फसलों को नुकसान, 7,000 हेक्टेयर प्रभावित, किसानों को भारी मार। तापमान में गिरावट की संभावना।