मुंबई : उत्तर भारतावर पुन्हा एकदा पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर भारताच्या टोकावर बर्फवृष्टी होणार आहे.
या बदलत्या हवामानामुळे किमान तापमानात घट होणार आहे. परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा प्रभाव जाणवणार असून, हा बदल २६ जानेवारीनंतर जाणवणार आहे.
मुंबईचे किमान तापमान आठवड्याच्या सुरुवातीला १६ अंशावर घसरले होते. परिणामी मुंबईत ठिकठिकाणी आलेल्या गारव्याने थंडीचा आनंद लुटला होता.
आता तापमान २० अंशावर स्थिर असले तरी २६ जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात घट होणार आहे. मंगळवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक होता.
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर
