भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार उष्णतेची लाट कशी ठरवली जाते ते सविस्तर जाणून घेऊया.
मैदानी भागात ४० डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात ३० डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा व समुद्र किनारी भागात ३७ अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मालाट प्रवणक्षेत्र मानले जाते.
तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या २ उपविभागांमध्ये सलग दोन दिवस ४.५ डिग्रीपेक्षा जास्त नोंदविल्यास दुसऱ्या दिवशी उष्मालाट जाहीर केली जाते.
उष्मालाटेची अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात/क्षेत्रात उच्च तापमानामध्ये अचानक ४.५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढ होणे यास उष्मालाट म्हणतात.
jagtik havaman din तसेच ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्यास heat wave तीव्र उष्णतेची लाट म्हणतात.
दरम्यान, जागतिक स्तरावर युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका या ठिकाणी वेगवेगळे निकष आहेत. कारण त्या-त्या भागातील सर्वसाधारण हवामानाची स्थिती ही वेगवेगळी असते.
...तर उष्माघात प्राणघातक
◼️ उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो.
◼️ त्याचा कधी कधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होतो.
◼️ कमाल तापमान सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.
◼️ उष्माघात ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे.
◼️ जी शरीराच्या तापमानाचे नियंत्रण यंत्रणा असफल झाल्याने होते. प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान ४० किंवा त्याहून अधिक होते.
◼️ ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.
उष्माघाताचा धोका कोणत्या गटांसाठी अधिक असतो?
वयोवृद्ध आणि लहान मुले, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी, खेळाडू आणि सैन्यातील जवान इ.
अधिक वाचा: गॅस बुकिंगसाठी मर्यादा; आता 'या' योजनेतील रेशनकार्डधारकांना प्रत्येकी ५ लिटर रॉकेल मिळणार?
