Join us

पातळी वाढत असल्याने कोणत्याहीक्षणी सुरू होऊ शकतो वीसर्ग; निम्न दुधना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:44 IST

निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणी नदीपात्रात सोडावे लागू शकते.

निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणीनदीपात्रात सोडावे लागू शकते. यासाठी धरण प्रशासनाने जिल्हाधिकारी परभणी, नांदेड यांना पत्र देऊन नदीकाठच्या गावांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

परभणी जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे नन्म दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली आहे. शनिवारी रात्री ९ वा. पाणीपातळी ४२१.१५० मीटर इतकी झाली असून, साठा ३३०.६०८ दलघनमी (सुमारे ५२.८५ टक्के) पोहचला आहे. दरम्यान धरणक्षेत्रातील भूसंपादन प्रक्रिया यावर्षी ही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे धरणात ७५ टक्के पेक्षा अधिक पाणी साठा करता येणार नाही.

धरणाची जलपातळी ३१ जुलैपूर्वी ४२४.८७० मीटर (६८.०४ टक्के) पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केव्हाही होऊ शकतो. शिवाय आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आल्याने धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्याची आवश्यकता भासू शकते.

त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना संभाव्य पूरस्थितीचा धोका आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित गावांनी सतर्कता आणि खबरदारी घ्यावी, नागरिकांनी नदीपात्र आणि परिसर टाळावा, जनावरे, वाहने वा पाळीव प्राणी नदीकिनारी नेऊ नयेत, याबाबत निम्न दुधना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता ह.सं. धुळगुंडे यांनी दिला आहे.

हेही वाचा : UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी

टॅग्स :मराठवाडाजलवाहतूकपाणीधरणनदीशेती क्षेत्रपाऊस