अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ४५ हजार ४५५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे.
यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होणार आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने धरणातील विसर्ग ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - क्षमताकोयना - १००.१३ - १०५.२५धोम - १२.६४ - १३.५०कन्हेर - ९.४४ - १०.१०वारणा - २८.९३ - ३४.४०दूधगंगा - २०.५१ - २५.४०राधानगरीम - ८.०१ - ८.३६तुळशी - ३.३६ - ३.४७धोम-बलकवडी - ३.७९ - ४.०८उरमोडी - ९.४४ - ९.९७तारळी - ५.१७ - ५.८५अलमट्टी - १२०.९२ - १२३
अधिक वाचा: आता शेतजमिनीचे जुने दस्त डिजिटल स्वाक्षरीसहीत मिळणार ऑनलाईन; वाचा सविस्तर