सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत पाथरपुंज येथे २९, निवळे १७, धनगरवाडा १३, चांदोली ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक २७७४ क्युसेकने सुरू आहे.
त्यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे आज शनिवारी सकाळी अकरा वाजता बंद करण्यात आले असून, वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग १६३० क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी कमी होत आहे. पाथरपुंजने चार हजार मिमी पार केला आहे.
चांदोली धरण परिसरात सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत ६ मिमी पाऊस झाला आहे. चांदोली धरणात आजअखेर २८.३८ टीएमसी म्हणजे ८२.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची ६२०.६० मीटर पाणी पातळी आहे.
धरणात २७७४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गतवर्षी धरणात २९.६० टीएमसी पाणीसाठा होता. सततच्या पावसामुळे नदीकाठावरील शेतातील पिके वारणा सहा दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी शेतीची कामे करण्यात व्यस्त आहेत.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये
पाथरपुंज - २९ मिमी (४५३२)निवळे - १७ (३६९५)धनगरवाडा - १३ (२३०३)चांदोली - ६ (२११३)
मंडलनिहाय पडलेला पाऊस व कंसात यावर्षी व गतवर्षीचा पाऊस मिमीमध्ये
शिराळा - ३.५० ( ५११.००)शिरशी - ४.८० (७६४.२०)मांगले - ३.५० (५०४.६०)सागाव - ४.५० (६१९.८०)चरण - ७ (१६२०.८०)वारणावती - ६ (२०५७)कोकरूड - ५ (१०२९.८०)