Lokmat Agro >हवामान > उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

5000 cusecs water release from Ujani Dam | उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

उजनीतून पाणी सोडण्यासाठी गणेश चतुर्थीचा अर्थात बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त साधला असून, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातूनपाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्व नियोजनाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी दि. १७ तारखेपासून उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडणे अपेक्षित होते. परंतु, पालकमंत्र्यांचा आदेश नसल्याने पाणी सोडण्यास विलंब होत गेला.

अखेर मंगळवारी पालकमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उजनी धरण प्रशासनाने दुपारी दोन वाजल्यापासून उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून प्रथम १६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ केला. यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडून त्यामधून २४०० क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. यामध्ये सायंकाळपर्यंत वाढ करून तो ३४०० क्युसेक करण्यात आले. विद्युत प्रकल्पाद्वारे १६०० क्युसेक व धरणाच्या दरवाजातून ३४०० क्युसेक असा एकूण ५००० क्युसेकने विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास नऊ दिवस लागणार
धरणात सध्या एकूण जलसाठा ७६.२९ टीएमसी एवढा आहे, तर उपयुक्त साठा फक्त १२.६३ टीएमसी एवढाच आहे. यातूनच हे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचण्यास पाच दिवस, तर औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास नऊ दिवस लागणार आहेत.

Web Title: 5000 cusecs water release from Ujani Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.