Join us

पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे ओव्हर फ्लो; ८ धरणे शंभरीच्या काठावर तर केवळ एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:00 IST

पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या काठावर आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

भरत निगडे 

पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या काठावर आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा २१७.९९ टीएमसी असलेल्या धरणांमध्ये ९९.९७टक्के पाणी साठले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर उसळली आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता पुढील जूनपर्यंत तरी दूर झाली आहे.

पावसाळ्यातील सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८६२ मिमी पावसाची अपेक्षा असताना ७४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने जूनमध्ये काही धरणे ओव्हरफ्लो झाली होती.

जुलैमध्ये पश्चिम पट्टधातील भात खाचऱ्यांमुळे धरणांत नव्याने पाण्याची आवक झाली. ऑगस्टमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणे भरून वाहू लागली.

या धरणांमधून डाव्या-उजव्या कालव्यांना, विद्युतगृहांना आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, घोड व नीरा या नद्या दुथडी भरून वाहिल्या.

गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांत केवळ १३२.४० टीएमसी (६६ टक्के) पाणीसाठा होता. यंदा मात्र दुप्पट साठा झाल्याने पाण्याची स्थिती सुधारली आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणांत एक जूनपासून ७९.९४ टीएमसी नव्याने पाणी दाखल झाले आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरणांत ४८.३०६ टीएमसी (९९.४५ टक्के) साठा आहे.

ओव्हर फ्लो धरणे

येडगाव, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडियळे, आंधा, पथना, टेमघर, वरसगाय, पानशेत, गुंजवणी, नौरा देवघर, भाटघर, वौर, नाझरे, उजनी ही १७ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, विल्हेवाडी, घोड धरणांत ६७.९३ टीएमसी नव्याने साठले आहे.

हेही वाचा : गोठ्यातील स्वस्त, सोपा आणि सुरक्षित स्वच्छतेचा उपाय; ‘हे’ रसायन ठरतंय रोगराईवर रामबाण पर्याय

टॅग्स :पुणेपाणीधरणनदीपाऊसशेती क्षेत्र