Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > काय सांगताय एक किलोचा बटाटा; शेतकरी सुखदेव यांची अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादनाची कमाल

काय सांगताय एक किलोचा बटाटा; शेतकरी सुखदेव यांची अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादनाची कमाल

What is a one potato one kilogram? farmer sukhdev maximum yield of as much as four tons in half acre | काय सांगताय एक किलोचा बटाटा; शेतकरी सुखदेव यांची अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादनाची कमाल

काय सांगताय एक किलोचा बटाटा; शेतकरी सुखदेव यांची अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादनाची कमाल

कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास काहीही अशक्य नसते याची प्रचिती कान्हूर मेसाई (ढगेवाडी) ता शिरूर येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी दाखवून दिली आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातुन फक्त अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादन घेतले आहे.

कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास काहीही अशक्य नसते याची प्रचिती कान्हूर मेसाई (ढगेवाडी) ता शिरूर येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी दाखवून दिली आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातुन फक्त अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादन घेतले आहे.

सिकंदर तांबोळी
कान्हूर मेसाईत आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातुन फक्त अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादन घेतले आहे. सध्याचा बाजार भावाप्रमाणे सुमारे साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहेत कष्ट व जिद्दीतून चांगले उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आहे.

कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास काहीही अशक्य नसते याची प्रचिती कान्हूर मेसाई (ढगेवाडी) ता. शिरूर येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी दाखवून दिली आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातुन फक्त अर्धा एकरात तब्बल चार टन उत्पादन घेतले आहे.

सध्याचा बाजार भावाप्रमाणे सुमारे साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहेत कष्ट व जिद्दीतून चांगले उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आहे. शेतीमध्ये नानाविध प्रयोग करून आपली शेती आधुनिक पद्धतीने करण्यावर जोर देत प्रयोगशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी कष्टाला जिद्दीचे जोड देत आपल्या शेतामध्ये बटाटा पिकाची लागवड केली.

केवळ अर्धा एकर क्षेत्रामध्ये स्वतःच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करून खताचे योग्य मात्रा देत सरी पद्धतीने लागवड केली यासाठी सुमारे तीनशे किलो बियाणाचा वापर केला विशेष बाब म्हणजे लागवडीनंतर बटाटा पिकासाठी पोषक वातावरण राहिल्याने पिकावर कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करण्याची गरज भासली नाही. 

जवळपास एक एक बटाटा पाऊण किलो ते एक किलोच्या दरम्यान भरत असल्याचे दिसून येत असल्याचे खर्डे यांनी सांगितले. तीन महिन्यात चाळीस हजार रुपये मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कष्ट आणि जिद्द यांच्या जोडीला चांगली माहिती असलेल्या व्यक्तीकडून वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने भरघोस बटाट्याचे पीक घेता आले.

बटाटा साठवणुकीसाठी हवामान
बटाटा साठवण्यासाठी कमी तापमान आणि कमी आर्दता आवश्यक आहे. बटाट्यासाठी सर्वोत्तम साठवणूक तापमान ४ ते ६ डिग्री सेल्सिअस आहे. या तापमानात बटाट्याची गुणवत्ता चांगली राहते आणि त्यात खराब होण्याची शक्यता कमी असते. आर्द्रता ८५ ते ९० टक्के असावी, आर्द्रता जास्त असल्यास बटाट्यामध्ये बुरशी येण्याची शक्यता असते.

बटाटा साठवणूक कशी करावी?
बटाटा साठवण्यासाठी जागेत ५ ते ६ सें.मी. जाडीचा गवताचा थर टाकावा. त्यानंतर बटाटा पसरवावा. बटाट्याचे थर टाकल्यावर त्यावर पुन्हा गवताचा थर टाकावा, असे थर टाकून बटाटा साठवू शकता, बटाटा साठवणुकीसाठी ६० ते ६५ टक्के आर्दता आणि १० ते १२ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. बटाटा साठवणुकीसाठी वाळू, चांगल्या दर्जाचे शेणखत किवा प्लास्टिकचा वापर करू शकता, बटाटा काढणी, प्रतवारी व साठवणुकीसाठी शेतकऱ्यांनी योग्य पद्धतींचा अवलंब करावा. यामुळे बटाट्याची प्रत सुधारण्यास आणि त्याचे नुकसान कमी होण्यास मदत होते.

अधिक वाचा: बटाट्याची काढणी व प्रतवारी कशी केली जाते?

Web Title: What is a one potato one kilogram? farmer sukhdev maximum yield of as much as four tons in half acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.