Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई

दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई

Two tons prodution of ridge gourd in 10 harvestings; Pramod earned 70 thousand in 20 days | दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई

दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई

farmer success story पारगाव (ता. दौंड) आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पारगाव येथील तरुण शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडका पिकातून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

farmer success story पारगाव (ता. दौंड) आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पारगाव येथील तरुण शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडका पिकातून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

बापू नवले
केडगाव: पारगाव (ता. दौंड) आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पारगाव येथील तरुण शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडका पिकातून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अवघ्या २० दिवसांत त्यांनी सुमारे २ टन उत्पादन घेतले. शेतीत पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ताकवणे यांनी सुरुवातीला जमीन मशागत करून ६x६ फूट अंतरावर पट्टा पद्धतीने लागवड केली.

सरीमध्ये शेणखतासोबत आवश्यक रासायनिक खते दिली. प्रत्येक रोपाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचन बसवले आणि त्यावर मल्चिंग पेपर अंथरला.

नामांकित कंपनीचे दर्जेदार बियाणे वापरून लागवड करण्यात आली. पिकाच्या वाढीच्या टप्प्यात चार वेळा आळवणी करून, वेल वाढल्यानंतर तार व काठीच्या साहाय्याने मंडप उभारला.

प्रत्येक वेल सुतळीने बांधल्यामुळे पिकाला योग्य आधार मिळाला. दर पाच दिवसांनी नियमित औषध फवारणी केल्याने रोगराईवर नियंत्रण मिळाले आणि उत्पादनात वाढ झाली.

या सर्व नियोजनाचा परिणाम म्हणून पहिल्याच २० दिवसांत सुमारे १० तोडे झाले आणि सरासरी ३५ रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यामुळे ताकवणे यांना ७० हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.

उत्पादन झालेला माल गुलटेकडी, यवत, पारगाव आणि केडगाव येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे.

या शेतीकामात त्यांच्या आई मंदाकिनी ताकवणे व पत्नी अर्चना ताकवणे यांची तोडणीसाठी मोलाची साथ मिळत आहे. तसेच कृषी पदवीधर समीर जेधे यांचे मार्गदर्शनही लाभत आहे.

लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर आल्याने शिक्षण लवकर थांबवावे लागले. मात्र पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला पारंपरिक शेती करताना आता त्यांनी हायटेक व आधुनिक शेतीचा अवलंब केला आहे. ऊस, वांगे, काकडी, टोमॅटो यांसारख्या पिकांसोबत दोडक्याचे पीक घेत त्यांनी उत्पन्नात वाढ साधली आहे.

योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन घेता येते. येत्या काळात १० टन उत्पादन गाठण्याचा माझा प्रयत्न असेल असे ताकवणे यांनी सांगितले.

शेतीत आधुनिकतेचा अवलंब आणि कुटुंबाच्या साथीतून मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अधिक वाचा: Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलल्यामुळे 'या' गावांना लागली लॉटरी; दुर्गम भागाचा होणार कायापालट

Web Title : तुरई की खेती से किसान ने की शानदार कमाई

Web Summary : पारगाँव के किसान प्रमोद ताकवने ने ड्रिप सिंचाई और मल्चिंग जैसी आधुनिक तकनीकों का उपयोग करके 20 गुंटा भूमि पर तुरई की खेती से 20 दिनों में ₹70,000 कमाए, जिससे दो टन उपज हुई।

Web Title : Ridge Gourd Farmer Earns Big with Smart Farming Techniques

Web Summary : Pargaon farmer Pramod Takawane earned ₹70,000 in 20 days from ridge gourd cultivation on 20 Gunta land using modern techniques like drip irrigation and mulching, yielding two tons of produce.