सिध्दार्थ सरतापेवरकुटे मलवडी : उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवता येते. पण, शिक्षण घेऊनही काहीजण अद्ययावत शेती करतात. त्यातून लाखो रुपये कमावतात.
हेच दाखवून दिले आहे माण या दुष्काळी तालुक्यातील वरकुटे मलवडीच्या विनायक काळेल यांनी. त्यांनी उच्चशिक्षित पत्नीच्या मदतीने अवघ्या चार एकर शेवगा शेतीतून तब्बल ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच इतर शेतकऱ्यांपुढेही आदर्शही निर्माण केला आहे.
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील विनायक आप्पा काळेल आणि त्यांची पत्नी रेश्मा हे दोघेही उच्च विद्याविभूषित. विनायक काळेल यांनी एमएसडब्ल्यू तसेच अध्यापनशास्त्रातील डीटीएइ पदवी घेतली आहे.
त्याचबरोबर समुपदेशन क्षेत्रात १२ वर्षे नोकरीही केली आहे. पत्नी रेश्मा याही (एमए सेट उत्तीर्ण) आहेत. आईच्या मृत्यूनंतर विनायक यांनी नोकरी सोडून शेतीकडे लक्ष केंद्रित केले.
माध्यमातून शेतीला पारंपरिकबरोबरच आधुनिकतेची जोड दिली. गाव परिसरातच असणाऱ्या चार एकर शेतीवर बहुगुणी आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या शेवगा पिकातून प्रगतीच्या वाटचालीस सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी ओडिसा तीन जातीचे शेवगा बी आणून उगवणक्षमता वाढवून एक दिवस पाण्यात भिजत ठेवले व नंतर लागवड केली.
४ एकरवर शेवग्याचे पीककाळेल यांनी दोन हजार झाडांपासून ६ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. कमी खर्च आणि कमी पाण्यावर हे उत्पादन घेतले. त्यांची शेवगा शेंग ही बंगळुरू आणि चेन्नईला जाते.
आम्ही दोघे पती-पत्नी उच्चशिक्षित आहोत. सुरुवातीला आम्हाला शेतीविषयी थोडी आवड होती. शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही शेवगा पिकाची निवड केली. कुटुंबाच्या सहाय्याने आम्ही शेवगा पिकामध्ये चांगले उत्पन्न घेण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. यापुढेही आणखी वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करण्याचा मानस आहे. - विनायक काळेल, शेतकरी, वरकुटे मलवडी
अधिक वाचा: E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?
Web Summary : Vinayak Kalel, a highly educated farmer from a drought-prone area, earns ₹7 lakhs from four acres of drumstick farming. He and his wife adopted modern techniques, setting an example for other farmers.
Web Summary : सूखाग्रस्त क्षेत्र के उच्च शिक्षित किसान विनायक कालेल ने चार एकड़ सहजन की खेती से ₹7 लाख कमाए। उन्होंने और उनकी पत्नी ने आधुनिक तकनीक अपनाई, जिससे अन्य किसानों के लिए एक मिसाल कायम हुई।