lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर

कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर

Sanjeevani sugarcane factory of Kopargaon is making sugar free sugar | कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर

कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर

अनेक गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

अनेक गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव : अनेक गंभीर आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी सुरू केली आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून, त्याला ५० टक्के यश मिळालेले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जागतिक साखर धंद्याला वेगळी दिशा मिळेल, त्याचबरोबर लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहील, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधनात देशात तब्बल १०.१ कोटी मधुमेही असल्याचे समोर आले आहे.एवढेच नव्हे, तर मधुमेहपूर्व समजल्या जाणाऱ्या 'प्री-डायबेटिक' टप्यातल्या आणखी १३.६ कोटी व्यक्ती आहेत. ही गंभीर बाब डोळ्यासमोर ठेवून कारखान्याने जिभेला गोड तर लागेल परंतु, रक्तातील साखर वाढणार नाही, अशी साखर बनविण्याचे ठरविले.

साखरेमध्ये सल्फर आहे, त्याचे शरीरावर परिणाम होतात असे मानले जाते. साखरेला पांढरा रंग येण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो. आता सल्फर विरहित साखर बनविण्यास कोल्हे कारखान्याने सुरुवात केली आहे. रॉ शुगरमध्ये सल्फर नसते. ती पांढऱ्या रंगाची नसते. रॉ शुगर येथे तयार होते. आता सल्फर विरहित 'शुगर फ्री' साखर बनणार आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. तीन शास्त्रज्ञ यावर काम करीत आहेत. त्याला ५० टक्के यश मिळालेले आहे. लवकरच शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केला.

उसाच्या रसापासून शुगर फ्री साखर बनविण्याचा देशातील पहिला प्रयोग सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना करीत आहे. यापूर्वीही कारखान्याने अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत, स्व. शंकरराव कोल्हे यांनी साडेचार वर्षापूर्वी ज्यूस टू इथेनॉल प्रकल्प सुरू केला. शंभर टक्के आपलेच रॉ मटेरिअल बापरून पॅरासिटेमॉल तयार करणारा कोल्हे कारखाना पहिला ठरला होता, त्याचा औषधात वापर होतो. 'शुगर फ्री' साखरेचा प्रयोग यशस्वी होणारच आहे. ते झाल्यास जागतिक साखर धंद्याला वेगळी दिशा मिळेल. - बिपीन कोल्हे, अध्यक्ष, सजीवनी उद्योग समूह, कोपरगाव

Web Title: Sanjeevani sugarcane factory of Kopargaon is making sugar free sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.