विजयकुमार गाडेकर
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच भाऊ व भावजयीने दिलेल्या साथीच्या पाठबळावर बीड जिल्ह्याच्या चाव्हरवाडी (ता. शिरुर कासार) येथील अल्पभूधारक शेतकरी भोलाजी खेंगरे यांचा मुलगा नितीन खेंगरे हा उपजिल्हाधिकारी झाला आहे.
शिरुर कासार तालुक्यातील चाव्हरवाडीत केवळ एक एकर शेती असलेले भोलाजी बाजीराव खेंगरे यांना दोन मुले असून मोठा मुलगा सुंदर हा रांजणगाव येथे खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, तर दुसरा मुलगा नितीन होय.
नितीन याला त्याचा मोठा भाऊ सुंदर आणि भावजयीची साथ मिळाल्याने तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एसईबीसी प्रवर्गातून १३९ क्रमांक आला आहे.
एसईबीसी प्रवर्गातून बाजी
• शिरूर तालुक्यातील चाव्हरवाडीत केवळ एक एकर शेती असली तरी भोलाजी खेंगरे यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. शेतीत काबाडकष्ट करून त्यांनी मुलांसाठी पैसे पुरवले.
• धाकटा मुलगा नितीन याने २०२५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नितीन याने एसईबीसी प्रवर्गातून बाजी मारली आहे.
प्रशासकीय सेवेत तालुक्याचा दबदबा
• शिरूर कासार तालुक्यात या पूर्वी कोळवाडीतील विजय नेटके, नांदूर येथील दीपा जेधे यांच्यासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी महसूल, पोलिस विभागात सेवेत उच्चपदस्थ प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
• आता नितीन खेंगरे याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. प्रशासकीय सेवेत तालुक्याचा दबदबा निर्माण झाला आहे.
• शिरूर कासार तालुक्याची ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून असलेली ओळख पस लागली आहे
मोफत अभ्यासिकेची गरज
शिरूर कासार तालुक्यात अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक पटीने वाढ होऊ शकते. मात्र, यासाठी तालुक्यात योग्य मार्गदर्शनाची मोफत असल्याचे मत अप्पासाहेब अभ्यासिकेची गरज पचने यांनी व्यक्त केले.
