Lokmat Agro >लै भारी > उच्चशिक्षित शेतकरी अवधूतची आंबा प्रक्रिया उद्योगात गगनभरारी; वाचा सविस्तर

उच्चशिक्षित शेतकरी अवधूतची आंबा प्रक्रिया उद्योगात गगनभरारी; वाचा सविस्तर

Highly educated farmer Avadhut mango processing industry is booming; Read in detail | उच्चशिक्षित शेतकरी अवधूतची आंबा प्रक्रिया उद्योगात गगनभरारी; वाचा सविस्तर

उच्चशिक्षित शेतकरी अवधूतची आंबा प्रक्रिया उद्योगात गगनभरारी; वाचा सविस्तर

Farmer Success Story वडिलोपार्जित बागायती करत असताना आडी (ता. रत्नागिरी) येथील अवधूत रामदास करमरकर प्रक्रिया यांनी उद्योग व्यवसायात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी भरारी घेतली आहे.

Farmer Success Story वडिलोपार्जित बागायती करत असताना आडी (ता. रत्नागिरी) येथील अवधूत रामदास करमरकर प्रक्रिया यांनी उद्योग व्यवसायात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी भरारी घेतली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : वडिलोपार्जित बागायती करत असताना आडी (ता. रत्नागिरी) येथील अवधूत रामदास करमरकर प्रक्रिया यांनी उद्योग व्यवसायात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी भरारी घेतली आहे.

अवधूत यांनी एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे नोकरी केली. परंतु, नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी बागायतीकडे लक्ष दिले.

आंबा हंगामात आंबा काढून विक्री करताना, काही वेळा दर कमी मिळतो व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यावर पर्याय म्हणून आंब्यावर प्रक्रिया करून उत्पादन निर्मिती केली तर जास्त पैसे मिळतील.

याच उद्देशाने ते प्रक्रिया उद्योग व्यवसायाकडे वळले. कृषी व आत्मा विभागातर्फे शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळताच अवधूत यांनी या योजनेचा लाभ घेत प्रक्रिया उद्योग सुरू केला.

गेल्या चार वर्षात आंबा, फणसावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करून विक्री करत आहेत.

आंबा खरेदी
गेली चार वर्षे अवधूत यांच्या उद्योगाची प्रगती सुरू आहे. स्वतःच्या बागेतील आंबा विक्री न करता, व्यवसायासाठीच वापरतात. शिवाय गावातील शेतकऱ्यांकडील आंबा खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांना आवडणारे परंतु थोडे हटके पदार्थ तयार करून विक्री करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आंबा हंगामात कायम २०-२२, कायमस्वरूपी ४ ते ५ मजुरांना काम मिळाले आहे.

प्रक्रिया उद्योगामुळे फायदा
अवधूत यांनी 'स्वामी कोकण प्रॉडक्ट' नावाने विविध पदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले आहेत. आमरस, आंबा पोळी, मॅगो स्लाइस इन पल्प, फणस रस, फणस पोळी, फणस इन्स्टंट भाजी, शिजवलेल्या आठला, पिकलेला ड्राय गरा, आंबा पावडर, पाकातील आंबा, अननस काप व गरे यासारखे विविध पदार्थ तयार करत असून, बाजारात त्यासाठी मागणी चांगली आहे. आंबा, फणस नाशवंत असल्यामुळे प्रक्रिया करून पदार्थ विक्रीसाठी आणले असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे.

रानभाज्यांवर प्रक्रिया
पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे आवर्जून सेवन केले जाते. परंतु, या भाज्या हंगामी असल्याने ग्राहकांना पाहिजे तेव्हा उपलब्ध होत नाहीत. यासाठी रानभाज्यांवर प्रक्रिया करून ग्राहकांना बारमाही उपलब्ध करण्याबाबत अवधूत यांचे संशोधन सुरू आहे. लवकरच अशा प्रकारची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हंगाम संपल्यानंतर रानभाज्या उपलब्ध होतील.

शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली, त्याचा फायदा घेत प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. गेल्या चार वर्षांत विविध नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करत आहे. सध्या रानभाज्यांवर प्रक्रियेबाबत संशोधन सुरू आहे. लवकरच त्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. - अवधूत करमरकर, आडी-शिरगाव

अधिक वाचा: औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

Web Title: Highly educated farmer Avadhut mango processing industry is booming; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.