Join us

गृह उद्योगातुन घेतली भरारी; मांडे डेअरीची चव न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 11:37 IST

आपल्या छोट्याशा गृहउद्योगाने दाखवलेल्या मार्गावर यशस्वी वाटचाल करत आज १० ते १५ जणांना रोजगार देण्यासोबत सौ प्रिया करताहेत दुधाचा प्रक्रिया उद्योग.

रविंद्र शिऊरकर 

आपल्या छोट्याशा गृहउद्योगाने दाखवलेल्या मार्गावर यशस्वी वाटचाल करत आज १० ते १५ जणांना रोजगार देण्यासोबत सौ प्रिया करताहेत दुधाचा प्रक्रिया उद्योग.

छत्रपती संभाजीनगर येथील सौ प्रिया योगेश मांडे या पदवीच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षणातून बाहेर पडलेल्या. लग्नानंतर घरून काही तरी गृह उद्योग करावा यातून साडी विक्री, विविध हातकाम त्यांनी केले. दरम्यान एका उन्हाळ्यात मसाला ताक, लस्सी त्यांनी तयार केली व शेजारी असलेल्या काही महिलांना देखील दिली. त्यांना ती चव प्रचंड आवडली व हेचं का सुरू करत नाही असा सल्ला त्यावेळी मिळाला. 

आनंद डेअरी गुजरात, स्थानिक डेअरी पदार्थ प्रशिक्षणे आदी विविध ठिकाणांहून पुढे त्यांनी प्रशिक्षणे घेत आपला लिलीज फूड फॅक्टरी हा गृह उद्योग २०१४ ला सुरू केला. ज्यामध्ये मसाला ताक, रजवाडी झाक, लस्सी, सोलकढी आदींचा समावेश होता. 

पती योगेश मांडे हे संगीत क्षेत्रात वादक म्हणून काम करतात. त्यामुळे दररोज काम नसायचं. आपण जे करतोय ते एकत्रितपणे दुकान सुरू करून गृह उद्योगाला पुढे न्यायला हव अस येणार्‍या मागणीतून वारंवार भासायच. हेच कारण समोर ठेवत त्यांनी सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड छत्रपती संभाजीनगर येथे मांडे'ज डेअरी ची ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरुवात केली.  

आज पती योगेश यांच्या समवेत वेळेनुसार विक्री व वितरण, प्रक्रिया व्यवस्थापन, पॅकिंग आदी विविध कामांत सौ मांडे यांनी दहा ते पंधरा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी 

मांडेज डेअरी येथे विक्री होणारे पदार्थ व त्यांची मूल्ये

गाईचे दूध - ५० रुपये लिटर, म्हशीचे दूध - ६० / ७० रु. लिटर, गाईचे तुप - ६०० रु. किलो, म्हशीचे तुप - ६०० रु. किलो, चक्का दही - १०० आणि ६० रु. किलो, पनीर - २८० रु. किलो , लोणी - ४०० रु. किलो, खवा - २८० रु. किलो, ताक - ३० रु लिटर, मसाला ताक - ५० रु. लिटर, लस्सी - २०/३० रु., मिल्क केक - ४०० रुपये किलो, गुलाब जामून - १५ रु. पीस, ड्रायफ्रूट रबडी - ५०० रु. किलो, सिताफळ रबडी - ६०० रु. किलो, केसर इलायची श्रीखंड - ३०० रु. किलो, गुलकंद श्रीखंड - ३२० रु. किलो, आम्रखंड - ३४० रु. किलो. 

 

सौ प्रिया योगेश मांडे यांचे मांडेज डेअरी व लिलीज फूड फॅक्टरी चे उत्पन्न

विविध पदार्थांची मांडेज डेअरी येथून मागणी नुसार विक्री व लिलीज या नावाखाली विविध आकरांच्या पॅकिंग करून विक्री केली जाते. ज्यातून सरासरी ५० लाखांची वार्षिक उलाढाल होते. यातून दूध खरेदी ते विक्री दरम्यान येणारा प्रक्रिया, व्यवस्थापन, पॅकिंग असा विविध खर्च वगळता मांडे यांना ३० % पर्यंत नफा मिळतो. 

टॅग्स :दुग्धव्यवसायजागतिक महिला दिनशेतीदूधमराठवाडामहाराष्ट्र