lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

agriculture allied business make good income; Big opportunities in pig farming | शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

जिद्द मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन यातून उभारी घेत. सौ ऋजुता यांनी वराह पालनामध्ये निर्माण केलीये आपली वेगळी ओळख. 

जिद्द मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन यातून उभारी घेत. सौ ऋजुता यांनी वराह पालनामध्ये निर्माण केलीये आपली वेगळी ओळख. 

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर

जिद्द मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन यातून उभारी घेत. सौ ऋजुता यांनी वराह पालनामध्ये निर्माण केलीये आपली वेगळी ओळख. 

अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालं. चांगल्या पगाराची नोकरी सुरु होती. मात्र कुठे तरी आपण एका चक्रात अडकलो आहोत हे सतत जाणवत असायचं म्हणून नोकरी सोडून शेतीकडे वळावं असं नाशिक येथील सौ ऋजुता नारद चव्हाण यांना वाटायचं. 

यासोबत वडील स्व. जयंत नारद यांनी अनेकदा वराह पालनाचा दिलेला सल्ला सतत एक वेगळी वाट सुचवायचा. यातून वराह पालनाचा निर्णय घेत ऋजुता यांनी काही प्रशिक्षणे घेतली. आणि ११ जुलै २०१८ मध्ये हरियाणा येथून लार्ज व्हाईट यॉर्क शायर आणि लँड्रेस या ब्रिटिश आणि डेन्मार्क येथील प्रसिद्ध जातींच्या ३० मादा व ३ नर वरहांची खरेदी केली. 

पुढे आपल्या तीन एकर क्षेत्रापैकी १० गुंठे क्षेत्रात एक शेड उभारला. ज्यात मादांसाठी व पिल्लांसाठी वेगवेगळे कप्पे केले. आणि सुरुवात झाली नाशिकच्या व्हिजन २१ वराह पालन फार्मला.

पूर्णपणे ब्रिडिंगसाठी होते विक्री
एक मादा सर्वसाधारण चार महिन्यांच्या गर्भधारणेनंतर ८ ते १४ पिल्लांना जन्म देते. या सर्व पिल्लांची परिसरातील वेगवेगळ्या वराह पालन करणाऱ्यांना विक्री होते. ज्यात दोन ते अडीच महिण्यांचे सरासरी पंधरा वीस किलो वजन असलेली पिल्ले चार ते सहा हजारांना विकली जातात. 

कोरडी वैरण आणि वजन वाढ (ड्राय फीड)
वरहांना दैनंदिन मका, सोयाबीन, आणि विविध गुणधर्म युक्त खुराक दिला जातो. तसेच लसूण घास देखील वैरणीत वापरला जातो. याचे कोरडा खुराक दिल्याने अपेक्षित वजन वाढ मिळून येते. मात्र हॉटेलचे शिल्लक अन्न दिल्याने वजन वाढ मिळत वेळेत आणि अपेक्षित मिळत नसल्याचे ऋजुता सांगतात. 

वरहातील लसीकरण 
फारशा काही आजारांना वराह बळी पडत नसल्याने स्वाईन फ्ल्यू व एम एम डी सारख्या दोन लसींचे केवळ लसीकरण केले जाते. 

वराह पालनातून किती आहे उत्पन्न 
दैनंदिन कामात असलेल्या मजुरांची मजुरी, खाद्य, लसीकरण, आदी विविध खर्च जाता वराह पालनातून ऋजुता यांची वार्षिक ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. ज्यात सरासरी २५ ते ३० टक्के नफा असतो.

स्वच्छता आणि काटेकोर नियोजन हेच वराह पालनाचे यश आहे. आपण व्यवसाय करत आहोत त्यामुळे मनातील अनेक विचारांना व्यवसाय हे ठाम उत्तर असले की त्याचा परिणाम तुमच्या उद्योगावर होत नाही. वराह पालन हा जोडधंदा नियोजन बद्ध असेल तर तुम्हांला एका वेगळ्या उंचीवर नक्कीचं घेऊन जातो. यात भविष्यात खूप मोठ्या संधी आहे सोबत यात अडचणी कमी आहेत. - सौ. ऋजुता नारद चव्हाण

Web Title: agriculture allied business make good income; Big opportunities in pig farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.